Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune ZP : सुनेत्रा पवारांकडे निर्णयाचा अधिकार; काही इच्छुकांकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सह्यांचे राजकारण

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांकडून लॉबिंगचे राजकारण रंगू लागले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 16, 2026 | 05:50 PM
सुनेत्रा पवारांकडे निर्णयाचा अधिकार; काही इच्छुकांकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सह्यांचे राजकारण

सुनेत्रा पवारांकडे निर्णयाचा अधिकार; काही इच्छुकांकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सह्यांचे राजकारण

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांकडून लॉबिंगचे राजकारण रंगू लागले आहे. पक्षाने उमेदवार निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवले असतानाही काही इच्छुकांकडून सदस्यांच्या सह्या गोळा करून शिफारस व पाठिंब्याची पत्रे तयार करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

 

पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे ५१ सदस्य असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर पक्षाचीच निवड होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी उमेदवार ठरविण्याचे सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या निर्णयानुसारच अधिकृत उमेदवारांची घोषणा होणार आहे.

मात्र, या निर्णयानंतरही काही इच्छुक सदस्यांकडून शिफारसपत्रे व पाठिंब्याच्या सह्या गोळा करण्याची मोहीम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. “कोणालाही नाराज करायचे नाही म्हणून सदस्य सह्या करतात; मात्र त्याचा अर्थ तो आमचा ठाम पाठिंबा आहे असे मानू नये,” अशी भूमिका काही नवनिर्वाचित सदस्यांनी व्यक्त केली. सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांच्याकडे असताना असे लॉबिंग करण्यामागे नेमका उद्देश काय, असा सवालही सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी

अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी (१८ मार्च) होणार असून त्या दिवशी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. अध्यक्षपदासाठी दौंडचे तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले वीरधवल जगदाळे, बारामतीचे माजी सभापती करण खलाटे, ज्येष्ठ सदस्य शांताराम इंगवले, विक्रम खुटवड, माजी उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील आणि तुषार थोरात यांची नावे चर्चेत आहेत.

हे सुद्धा वाचा : भटक्या कुत्र्यांनी 15 मिनिट लचके तोडले; चाकणमध्ये महिलेचा तडफडून मृत्यू

उपाध्यक्षपदासाठी महिला सदस्यांचे लागले लक्ष

दरम्यान, उपाध्यक्षपदासाठी महिलेला संधी दिली जाणार का, याकडे महिला सदस्यांचे लक्ष लागले आहे. अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदासाठी काही इच्छुकांनी जिल्हा बँकेच्या संचालकांची शिफारसही घेतल्याची चर्चा आहे. जिल्हा बँक आणि जिल्हा परिषद यांचा थेट संबंध नसतानाही अशा प्रकारे पाठिंबा गोळा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पक्षांतर्गत बोलले जात आहे. विशेषतः दौंड आणि इंदापूर तालुक्यांमध्ये सदस्यांकडून पाठिंब्याच्या पत्रांवर सह्या घेण्यासाठी दबावाचे राजकारण सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: The number of aspirants for the posts of pune zilla parishad president and vice president has increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • NCP News
  • pune news
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.