Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या गाड्यांच्या स्वागतासाठी पीएमपी सज्ज; डेपो अन् पार्किंगसाठी 100 एकर जागेची मागणी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेल्या 'पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या' (पीएमपी) ताफ्यात आगामी काळात मोठी भर पडणार आहे. पुढील सहा महिन्यांत तब्बल १,७०० नवीन साध्या आणि ई-बसेस ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2026 | 06:07 PM
नव्या गाड्यांच्या हडपसर-जेजुरी-नीरा पीएमपीएल सेवा दिवसभर ठप्प; बेजबाबदार कारभारावर प्रवाशांचा संतापपीएमपी सज्ज; डेपो अन् पार्किंगसाठी 100 एकर जागेची मागणी

नव्या गाड्यांच्या हडपसर-जेजुरी-नीरा पीएमपीएल सेवा दिवसभर ठप्प; बेजबाबदार कारभारावर प्रवाशांचा संतापपीएमपी सज्ज; डेपो अन् पार्किंगसाठी 100 एकर जागेची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची जीवनवाहिनी असलेल्या ‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या’ (पीएमपी) ताफ्यात आगामी काळात मोठी भर पडणार आहे. पुढील सहा महिन्यांत तब्बल १,७०० नवीन साध्या आणि ई-बसेस ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, या वाढत्या बसेसच्या संख्येमुळे प्रशासनासमोर ‘पार्किंग’ आणि नवीन ‘डेपो’ उभारणीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पीएमपीने पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीएकडे वेगवेगळ्या ४९ ठिकाणी एकूण १०० एकर जागेची आग्रही मागणी केली आहे.

 

सध्या पीएमपीकडे उपलब्ध असलेली जागा अपुरी पडत असल्याने बसेस भर रस्त्यात पार्क कराव्या लागत आहेत. पीएमआरडीएच्या हद्दीत बस सेवा वाढवली असली, तरी त्या भागात पुरेसे डेपो उपलब्ध नाहीत. नव्या बसेस आल्यानंतर ही समस्या अधिक गंभीर होऊ नये, म्हणून प्रशासनाने आतापासूनच नव्या जागांचा शोध सुरू केला आहे. महापालिका, पीएमआरडीए आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे या जागेची मागणी करण्यात आली असून, जागा मिळाल्यास ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवासी सेवेचा विस्तार करणे सोपे होणार आहे.

अशी आहे सद्यस्थिती

ताफ्यातील एकूण बसेस : १,९२५

एकूण नियोजित मार्ग : ४०८

सध्या कार्यरत डेपो (आगार) : १७

नव्याने दाखल होणाऱ्या बसेस : १,७००

हे सुद्धा वाचा : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा निविदा वादाच्या भोवऱ्यात; संदीप वाघेरेंकडून प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

केंद्र सरकार आणि पीएमआरडीएकडून मदत

प्रवासी सेवेचा ताण कमी करण्यासाठी दोन्ही महापालिकांच्या निधीतून ७०० बसेस खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्या लवकरच ताफ्यात येतील. याशिवाय, ‘पीएमआरडीए’ने ५०० बसेस खरेदीसाठी आर्थिक तरतूद केली आहे. तसेच, केंद्र सरकारच्या ‘पीएम ई-ड्राइव्ह’ उपक्रमांतर्गत १,००० बसेसची मागणी करण्यात आली आहे. या नव्या बसेस महामंडळाच्या स्वमालकीच्या असणार आहेत, ज्यामुळे भविष्यात पीएमपीचा ताफा कमालीचा मजबूत होईल.

ताफ्यात नव्या बसेस दाखल होणार असल्याने बससंख्या वाढणार आहे. त्यासाठी जागेची मोठी गरज भासत आहे. म्हणूनच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीएकडे आम्ही जागेची मागणी केली आहे. — महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय फेरबदल; तब्बल 272 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

Web Title: The number of pmp buses is likely to increase over the next six months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • PMPML Bus
  • pune news

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.