संग्रहित फोटो
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरातील जलकुंभांच्या परिचालन आणि देखभाल-दुरुस्तीसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. या निविदांमधील अटी व शर्ती काही ठराविक ठेकेदारांच्या फायद्यासाठी जाणीवपूर्वक जाचक ठेवल्याचा आरोप करत, ही निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करून नव्याने पारदर्शक निविदा प्रसिद्ध करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
नेमका वाद काय?
पाणीपुरवठा विभागाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निविदा क्र. पाणीपुरवठा/HO/2/39/2026-2027 आणि पाणीपुरवठा/HO/3/2/2026-2027 यांमधील अनेक अटी स्पर्धाविरोधी आणि विसंगत असल्याचे वाघेरे यांनी निवेदनात म्हटले आहे. विशेषतः काही अटींमुळे निविदा प्रक्रियेत पारदर्शकता उरलेली नसून, ‘रिंग’ पद्धतीने ठेके मिळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
प्रमुख आरोप खालीलप्रमाणे केले आहेत.
स्पर्धा मर्यादित करण्याचा प्रयत्न : निविदेतील अटींमुळे सुशिक्षित बेरोजगार, स्वयंरोजगार गट आणि सेवा सहकारी संस्थांना या प्रक्रियेतून बाहेर ठेवले जात आहे.
अव्यावहारिक अटी : प्रत्यक्ष कामाचे स्वरूप व्हॉल्व ऑपरेशन आणि किरकोळ दुरुस्तीचे असताना, त्याला ‘परिचालन’ अशी व्यापक संज्ञा देऊन त्याद्वारे अटी जाचक करण्यात आल्या आहेत.
अनुभवाच्या अटीचा फटका : अकुशल कामगारांसाठी अनुभव प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आली आहे, जी पूर्णपणे अन्यायकारक आहे.
हे सुद्धा वाचा : पैठण तालुक्यात भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
नगरसेवक वाघेरे यांनी या प्रकरणी प्रशासनाला जाग आणण्यासाठी खालील मागण्या केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय फेरबदल
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल करण्यात आला असून, प्रशासनाने तब्बल २७२ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या आणि कामकाजात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने ही व्यापक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेतील या मोठ्या बदली प्रक्रियेमुळे कर्मचारी वर्गात दिवसभर चर्चांचे वारे वाहत होते. या बदल्यांचा महापालिकेच्या आगामी कामकाजावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






