Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा! आरव, शरण्यासह पाच जणांची विजेतेपदाला गवसणी

Table Tennis: १५ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत सातव्या मानांकित वरदान कोलतेने नवव्या मानांकित नीरज नांदेडेचा ११-६, ७-११, ११-७, ११-५ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2026 | 05:20 PM
आरव बापट, शरण्या पटवर्धन यांना विजेतेपद

आरव बापट, शरण्या पटवर्धन यांना विजेतेपद

Follow Us
Follow Us:
  • आरव बापट, शरण्या पटवर्धन यांना विजेतेपद
  • वरदान, शौनक, वाक्राडकर यांचीही आपापल्या गटात बाजी
  • बालुफ ऑटोमेशन करंडक टेबल टेनिस स्पर्धा 
पुणे/Table Tennis: पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित बालुफ ऑटोमेशन करंडक डॉ. सतीश ठिगळे मेमोरियल पाचव्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत आरव बापट, शरण्या पटवर्धन, वरदान कोलते, शौनक सानपूरकर, संतोष वाक्राडकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

प्रभात रोड (Pune) येथील सिम्बायोसिस स्कूल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ११ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत तिसऱ्या मानांकित आरव बापटने अव्वल मानांकित नमन अग्रवालचा १०-१२, ११-८, ११-५, १२-१० असा पराभव करून विजेतेपद पटकावले. १५ वर्षांखालील मुलींच्या गटात दुसऱ्या मानांकित शरण्या पटवर्धन हिने शगुन गणेशेचा ११-७, ११-६,  १-७ असा सहज पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला. शरण्या ही बाल शिक्षण शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून, एमडब्ल्यूटीटीए येथे सराव करते.

Table Tennis: सुयोग पाटीलची जिद्द अन् दमदार खेळ! पिछाडीवरून मुसंडी मारत पटकावले राज्यस्तरीय विजेतेपद

१५ वर्षांखालील गटात नीरज पराभूत

१५ वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत सातव्या मानांकित वरदान कोलतेने नवव्या मानांकित नीरज नांदेडेचा ११-६, ७-११, ११-७, ११-५ असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. वरदान हा एज्युकॉन इंटरनॅशनल शाळेत शिकत असून, लक्षवेध टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक अनिल बांदेल यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

शौनकची लौकीकाला साजेशी खेळी

पुरुष गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित शौनक सानपूरकरने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत दहाव्या मानांकित शौरेन सोमणचा ११-८, १२-१०, ६-११, ११-७, ११-४ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. ४० वर्षांवरील प्रौढ गटात अंतिम सामन्यात सातव्या मानांकित संतोष वाक्राडकरने अव्वल मानांकित स्वानंद बेडेकरचा ११-७, ११-८, ९-११, १३-११ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

Tennis: शौरेन सोमणची दमदार कामगिरी! १७ आणि १९ वर्षांखालील गटात विजेतेपदावर नाव कोरले

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सिम्बायोसिसचे संचालक डॉ. अमेय येरवडेकर आणि मिसेस ठिगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, उपाध्यक्ष प्रकाश तुळपुळे, डॉ. उदय भालचंद्र, सचिव श्रीराम कोनकर, खजिनदार आशिष बोडस, सदस्य डॉ. मोहन उजगावकर, अजय सिधये, मुख्य पंच मधुकर लोणारे, सुरेंद्र देशपांडे यांची उपस्थिती होती.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टेनिस स्पर्धा कुठे पार पडली?

    Ans: जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा पुण्यातील सिम्बायोसिस स्कूल येथे पार पडली.

  • Que: १५ वर्षांखालील गटात कोणाचा पराभव झाला?

    Ans: १५ वर्षांखालील गटात नीरज नांदेडेचा पराभव झाला.

Web Title: Pune district table tennis arav bapat sharnya patwardhan winners sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • pune news
  • Sports News
  • Table Tennis

संबंधित बातम्या

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई
1

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे
2

Pune City Water Quota: पुण्याच्या पाणी कोट्याचा फैसला ‘वर्षा’वरच!; पालिकेची १८ टीएमसीची मागणी अन् नियोजन १३ टीएमसीचे

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!
3

Dr Shirish Hiremath Death: ४० हजारांहून अधिक अँजिओप्लास्टी करणारे प्रख्यात डॉ. शिरीष हिरेमठ काळाच्या पडद्याआड!

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन
4

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.