Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेला होणार मतदान

भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सरपंच आणि सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 23, 2026 | 01:43 PM
भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; 'या' तारखेला होणार मतदान

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा बिगुल वाजला; 'या' तारखेला होणार मतदान

Follow Us
Follow Us:

भोर : भोरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भोर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा अखेर बिगुल वाजला आहे. भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या सरपंच आणि सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये ९ सरपंच आणि ३४ सदस्य अशा एकूण ४३ जागांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

 

थेट सरपंच पदासाठी आपटी, करंदी खुर्द, कोळवडी, खडकी, प-हर बुद्रुक, रावडी, शिरवली, सोनवडी, वाढाणे या ९ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार असून. अंगसुळे, आंबेघर, आपटी, करंजे, करंदी खु., कांबरे खे.बा., कासुर्डी गु.मा., कुंबळे, कोर्ले, कोळवडी, खडकी, तेलवडी, प-हर बु., बसरापुर, म्हाकोशी, रावडी, वडतुंबी, वाढाणे, वारवंड, शिरगांव, शिरवली, सांगवी, सांगवी बु., सांगवी हि.मा., साळव आणि सोनवडी या ग्रामपंचायतीच्या ३४ सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, तहसीलदार राजेंद्र नजन व निवासी नायब तहसीलदार अरुण कदम यांनी दिली. तालुक्यातील या ग्रामपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधींचे निधन, राजीनामा किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. प्रशासनाने आता या जागा भरण्यासाठी कंबर कसली असून, २८ एप्रिलला होणाऱ्या मतदानाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

२९ एप्रिलला होणार मतमोजणी

ग्रामपंचायत पोटनिवडणूक – २०२६ एप्रिल महिन्यात होणार असून सोमवार (दि. ३०) भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांच्याकडून याबाबत नोटीस जाहीर होणार आहे. ७ एप्रिल ते १३ एप्रिल या कालावधीत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र सादर करावयाचे आहे. १५ एप्रिलला ११ वाजल्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे. १७ एप्रिलला दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेण्यासाठी मुदत असणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे. २८ एप्रिलला सकाळी साडेसात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार असून दुसऱ्या दिवशी २९ एप्रिलला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे.

हे सुद्धा वाचा : रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष मान्यता मिळवून देणार; रामदास आठवले यांचा निर्धार

असा आहे निवडणूक कार्यक्रम

मतदानाची तारीख : २८ एप्रिल २०२६,

मतमोजणी व निकाल : २९ एप्रिल २०२६

एकूण रिक्त जागा : ४३ (९ सरपंच + ३४ सदस्य)

Web Title: The schedule for the by elections of 26 gram panchayats in bhor taluka has been announced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • Election News
  • grampanchayat election result
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.