Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमध्ये मोठा फेरबदल; तब्बल 400 कोटींची अतिरिक्त तरतूद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पात स्थायी समितीने मोठे फेरबदल केले असून, सुमारे ४०० कोटी रुपयांच्या २५० उपसूचनांना मंजुरी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 17, 2026 | 06:02 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमध्ये मोठा फेरबदल; तब्बल 400 कोटींची अतिरिक्त तरतूद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बजेटमध्ये मोठा फेरबदल; तब्बल 400 कोटींची अतिरिक्त तरतूद

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पात स्थायी समितीने मोठे फेरबदल केले असून, सुमारे ४०० कोटी रुपयांच्या २५० उपसूचनांना मंजुरी दिली आहे. तत्कालीन आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एकाही नवीन प्रकल्पाचा समावेश नसल्याने, स्थायी समितीने शहराच्या विकासासाठी अनेक नवीन तरतुदी सुचवल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, एखादा मोठा प्रकल्प निधीअभावी रखडू नये म्हणून महापालिकेच्या मुदत ठेवी मोडण्याची तयारीही समितीने दर्शविली आहे.

 

बजेटमध्ये मोठी वाढ; उत्पन्नाचे नवे स्त्रोत

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ५ हजार ६५५ कोटी ७३ लाखांचा मूळ, तर शासकीय योजनांसह ९ हजार ३२२ कोटी १७ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, स्थायी समितीने यात ४०० कोटींची वाढ सुचवली आहे. हे वाढीव उत्पन्न मिळवण्यासाठी बांधकाम परवानगी विभागातून २०० कोटी, आकाशचिन्ह परवाना विभागातून ३४ कोटी आणि पाणीपट्टी व नवीन मालमत्ता करातून मोठा निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

गरज पडल्यास मुदत ठेवींचा वापर

स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी स्पष्ट केले की, महापालिकेकडे सध्या ५ हजार ६९० कोटींच्या ठेवी आहेत. त्यातील १ हजार ४५५ कोटींच्या सर्वसाधारण ठेवींचा वापर विशेष प्रकल्पांसाठी केला जाऊ शकतो. “एखादा महत्त्वाचा प्रकल्प निधीअभावी थांबू नये यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांना विश्वासात घेऊन या ठेवी मोडण्याचा विचार केला जाईल,” असे बारणे यांनी सांगितले.

‘नगरसेवक निधी’ची नवी संकल्पना

यावेळच्या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच ‘नगरसेवक निधी’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. प्रभागातील स्थानिक आणि लहान-मोठी कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी ३२ प्रभागांमधील प्रत्येक नगरसेवकाला प्रत्येकी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या शिफारसी

  • पवना जलवाहिनी प्रकल्पासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी.
  • नदी पुनरुज्जीवन प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद असावी.
  • शहरातील जलनिःसारण नलिका टाकणे तसेच देखभाल करण्यासाठी निधी.
  • आरोग्य व वैद्यकीय सेवांसाठी स्वतंत्र निधी.
  • स्थापत्य आणि विद्युत विभागासाठी आवश्यक निधी.
  • नवीन विकासकामे तसेच देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी निधी.
  • महापालिकेच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधण्यावर भर द्यावा.
  • सुमारे ३०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात.
२४ मार्चला विशेष सभा; कामकाजाच्या वेळेत बदल?

स्थायी समितीने मंजूर केलेल्या या सुधारित अर्थसंकल्पावर आता २४ मार्च रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा होणार आहे. दरम्यान, स्थायी समितीच्या साप्ताहिक बैठकीच्या वेळेत आणि दिवसात बदल करण्याचे संकेत बारणे यांनी दिले आहेत. सध्या बुधवारी दुपारी २ वाजता होणारी बैठक आता सदस्यांच्या सोयीसाठी सोमवार किंवा शुक्रवारी सकाळी ११ वाजता घेण्याचे नियोजन सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : नर्सची गळफास घेऊन आत्महत्या, जातीवाचक शिवीगाळ अन्….; सिडको ठाण्यात गुन्हा नोंद

नूतन आयुक्तांची उपस्थिती

नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीला भेट देऊन सर्व सदस्यांशी ओळख करून घेतली आणि शहराच्या विकासकामांबाबत माहिती जाणून घेतली.

Web Title: The standing committee has made major changes in the budget of pimpri chinchwad municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.