Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव, खानवडी आणि उदाचीवाडी येथील एकूण २५३.२१०९ हेक्टर खाजगी क्षेत्राच्या भूसंपादनास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 26, 2026 | 05:42 PM
पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

पुरंदर विमानतळ प्रकल्पाला वेग, 253 हेक्टर जमीन संपादनाला हिरवा कंदील; राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Follow Us
Follow Us:

पुणे : प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव, खानवडी आणि उदाचीवाडी येथील एकूण २५३.२१०९ हेक्टर खाजगी क्षेत्राच्या भूसंपादनास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, याबाबतची अधिसूचना २३ जून २०२६ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तावित विमानतळासाठी वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांतील एकूण २७५३.०५३ हेक्टर क्षेत्रावर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ अंतर्गत प्रकरण ६ व कलम २ खंड (ग) च्या तरतुदी १० मार्च २०२५ रोजी लागू करण्यात आल्या होत्या. त्यापैकी संयुक्त मोजणी अहवालानुसार १२१६.७५२३ हेक्टर क्षेत्रासाठी कलम ३२(१) अन्वये अधिसूचना यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

हरकती फेटाळून प्रक्रियेस मंजुरी

प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या पुनर्वसनासाठी भूखंड उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पारगाव, उदाचीवाडी, खानवडी आणि वनपुरी येथील २५३.२१०९ हेक्टर क्षेत्र संपादनासाठी आवश्यक असल्याचे भूसंपादन अधिकारी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने शासनाकडे शिफारस केली होती. यावरील हरकती फेटाळून शासनाने पुढील भूसंपादन प्रक्रियेस मंजुरी दिली आहे. शासनाने घातलेल्या अटींनुसार संबंधित क्षेत्राचे संपादन संमतीने व सलगतेने करण्यात येणार आहे. तसेच २४ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या १८८ व्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या दरानुसार जिल्हाधिकारी, पुणे यांनी निश्चित केलेला प्रति हेक्टर ३ कोटी ७९ लाख ७६ हजार २४० रुपये मोबदला दर लागू राहणार असून, त्यास मंत्रिमंडळ उपसमितीच्या अंतिम मंजुरीची अट असेल.

हे सुद्धा वाचा : आई- वडिलांकडे दुर्लक्ष, काहींनी पत्नीच्या नावे केल्या जमिनी; पुरंदर विमानतळावरुन कौटुंबिक वादांचे प्रकार

‘पास थ्रू’ पद्धतीने होणार भूसंपादन

दरम्यान, हे भूसंपादन ‘पास थ्रू’ पद्धतीने होणार असल्याने संबंधित कंपनीशी सामंजस्य करार करून नुकसान भरपाई, न्यायालयीन प्रकरणे, क्षेत्राचा ताबा आदी बाबींचा समावेश असलेला करार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. शासनाने २३ जून रोजी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर आता भूसंपादन अधिकारी व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

Web Title: The state government has approved land acquisition for the purandar airport project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 05:42 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
1

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
3

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
4

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.