Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिलिंगला लगाम! उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक; आरोग्य विभागाचा मोठा निर्णय

खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा वाढता खर्च आणि बिलिंगमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये, यासाठी वैद्यकीय सेवा व सुविधांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 26, 2026 | 03:42 PM
खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिलिंगला लगाम! उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक; आरोग्य विभागाचा मोठा निर्णय

खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिलिंगला लगाम! उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक; आरोग्य विभागाचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:
  • रुग्णालयांना मराठी व इंग्रजीत दरपत्रक लावावे लागणार
  • जाहीर दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास कारवाई
  • नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचे निर्देश
पुणे : खासगी रुग्णालयांमधील उपचारांचा वाढता खर्च आणि बिलिंगमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये, यासाठी वैद्यकीय सेवा व सुविधांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णालये, नर्सिंग होम आणि दवाखान्यांना मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये दरपत्रक लावावे लागणार आहे. दरपत्रक प्रदर्शित न करणे, जाहीर केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारणे किंवा छुपे शुल्क लावणे अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.

 

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने राज्य आरोग्य विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी नियमावली २०२१ मधील तरतुदीनुसार वैद्यकीय सेवा आणि सुविधांचे दर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. राज्यात २०२२ पासून या नियमाची अंमलबजावणी सुरू असली, तरी जिल्ह्यातील केवळ सुमारे २० टक्के क्लिनिक व रुग्णालयांकडून त्याचे पालन केले जात असल्याचे पुणे आयएमएकडून सांगण्यात आले.

उपचारांपूर्वी खर्चाची माहिती मिळणार

उपचार सुरू करण्यापूर्वी संबंधित सेवेचा दर रुग्ण व नातेवाइकांना समजल्यास आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे. संभाव्य उपचार खर्चाची माहिती मिळाल्याने रुग्णालयाची निवड करताना विविध पर्यायांची तुलना करणेही शक्य होईल. तसेच दरपत्रकातील शुल्क आणि प्रत्यक्ष बिलाची पडताळणी केल्यास अतिरिक्त आकारणी किंवा बिलिंगमधील तफावतीबाबतचे वाद कमी होण्यास मदत होणार आहे.

दरापेक्षा अधिक शुल्क आकारल्यास कारवाई

दरपत्रकात नमूद केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारणे, छुपे शुल्क लावणे अथवा दरपत्रकच प्रदर्शित न करणे, यांसारख्या प्रकारांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर दंडात्मक कारवाईबरोबरच परवाना रद्द करण्याची कारवाईही होऊ शकते. मात्र, तक्रारींची चौकशी, बिलांची पडताळणी आणि प्रत्यक्ष कारवाई किती प्रभावीपणे केली जाते, यावर या निर्णयाची अंमलबजावणी अवलंबून राहणार आहे.

हे सुद्धा वाचा : वाढलेल्या मतदानाचा कौल कुणाला? पदवीधरांत सोलापूर आघाडीवर; शिक्षकांत साताऱ्याचा सर्वाधिक प्रतिसाद

६,७३५ आरोग्य संस्थांची तपासणी अपेक्षित

पुणे शहर व जिल्ह्यातील ६ हजार ७३५ नोंदणीकृत रुग्णालये, पॅथॉलॉजी प्रयोगशाळा आणि आरोग्य सेवा संस्थांमध्ये या नियमांची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. संबंधित संस्थांनी दरपत्रक दर्शनी भागात लावले आहे का, त्यातील दर अद्ययावत आहेत का आणि प्रत्यक्ष बिलामध्ये त्याच दरानुसार शुल्क आकारले जाते का, याची तपासणी प्रशासनाला करावी लागणार आहे.

महाराष्ट्र नर्सिंग होम नोंदणी नियमावली २०२१ नुसार वैद्यकीय सेवा व सुविधांचे दर प्रदर्शित करणे आवश्यक आहे. राज्यात २०२२ पासून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील सुमारे २० टक्के क्लिनिक व रुग्णालयांकडूनच त्याचे पालन केले जाते.’  -डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, पुणे आयएमए
💡

Frequently Asked Questions

  • Que: खासगी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक आहे का?

    Ans: होय. रुग्णालये, नर्सिंग होम आणि दवाखान्यांना वैद्यकीय सेवा व सुविधांचे दरपत्रक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक आहे.

  • Que: रुग्णालयाने जाहीर दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास काय होईल?

    Ans: जाहीर दरापेक्षा अधिक शुल्क आकारणे, छुपे शुल्क लावणे किंवा दरपत्रक प्रदर्शित न करणे यांसारख्या प्रकारांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. गंभीर प्रकरणांत रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते.

  • Que: दरपत्रकामुळे रुग्णांना काय फायदा होणार आहे?

    Ans: उपचार सुरू करण्यापूर्वी संभाव्य खर्चाची माहिती मिळेल. रुग्णांना विविध रुग्णालयांच्या दरांची तुलना करता येईल आणि प्रत्यक्ष बिलातील अतिरिक्त शुल्क किंवा तफावत तपासणे सोपे होईल.

Web Title: The state health department has taken a major decision regarding private hospitals nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • Hospital
  • Hospital News
  • pune news

संबंधित बातम्या

शेतीच्या कामासाठी नदीवर गेले, पण परतलेच नाहीत! वीजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू
1

शेतीच्या कामासाठी नदीवर गेले, पण परतलेच नाहीत! वीजेच्या धक्क्याने पिता-पुत्राचा मृत्यू

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM
2

पुण्यातील समीर जैन यांची आर्थिक क्षेत्रात मोठी झेप! NJ Wealth सोबतच्या भागीदारीत २१५ कोटींचा AUM

वाढलेल्या मतदानाचा कौल कुणाला? पदवीधरांत सोलापूर आघाडीवर; शिक्षकांत साताऱ्याचा सर्वाधिक प्रतिसाद
3

वाढलेल्या मतदानाचा कौल कुणाला? पदवीधरांत सोलापूर आघाडीवर; शिक्षकांत साताऱ्याचा सर्वाधिक प्रतिसाद

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन
4

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे; मंत्री अतुल सावे यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.