Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळ तालुक्यात दुर्दैवी घटना; पवना नदीत पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू

मावळ तालुक्यातील थुगाव परिसरात पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 03, 2026 | 03:23 PM
मावळ तालुक्यात दुर्दैवी घटना; पवना नदीत पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू

मावळ तालुक्यात दुर्दैवी घटना; पवना नदीत पोहायला गेलेल्या तीन तरुणांचा बुडून मृत्यू

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ/सतिश गाडे : मावळ तालुक्यातील थुगाव परिसरात पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पर्यटकांच्या निष्काळजीपणावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

मृत तरुणांची नावे प्रथमेश शिंदे, अश्विन भालेराव आणि आयान शेख (सर्व राहणार पुणे) अशी आहेत. हे तिघे मित्र फिरण्यासाठी मावळमधील थुगाव परिसरात आले होते. पवना नदीच्या पात्रात पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याची खोली व प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी उडी घेतलेल्या इतर दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने तेही पाण्यात ओढले गेले. काही क्षणातच तिघेही पाण्याखाली गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’ व ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ या बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. निलेश संपतराव गराडे, अनिल आंद्रे, पिंटू मानकर, कैसर शेख, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, रवी कोळी, राजू सय्यद, अनिश गराडे, पोलीस पाटील धनंजय पोटफोडे तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. मोठ्या प्रयत्नांनंतर तिन्ही तरुणांचे मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, सुटीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या या तरुणांवर काळाने झडप घातल्याने थुगाव परिसरात तसेच पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून वारंवार सूचना देऊनही पर्यटकांकडून होणाऱ्या निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : विधान परिषद निवडणूक बिनविरोध! १० उमेदवारांचे अर्ज वैध, अपक्षांचे अर्ज बाद

पर्यटकांनी घ्यावी काळजी

नदी, धरण परिसरात पोहताना पाण्याची खोली आणि प्रवाह याचा अचूक अंदाज घेणे आवश्यक आहे. धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Three youths who went swimming in the pawana river drowned to death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Death
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
1

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त
2

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
3

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर,अन्…
4

वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर,अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.