Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे

Pavana Pipeline Project : स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा विरोध अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शासनाने प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यास मावळात पुन्हा मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

  • By anuradha sagar
Updated On: Jul 01, 2026 | 05:40 PM
Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा सुरू होणार? मावळात नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे
Follow Us
Follow Us:

Pavana Pipeline Project : मावळ तालुक्यातील सर्वाधिक वादग्रस्त प्रकल्पांपैकी एक असलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प तब्बल दीड दशकानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत या प्रकल्पासंदर्भात हालचाली सुरू असून, राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ३ जुलै रोजी महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत प्रकल्पावरील स्थगिती उठवण्याबाबत निर्णय झाल्यास, बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला पुन्हा गती मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे.

२००९ मध्ये पिंपरी-चिंचवड शहराला अधिक सुरक्षित आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प हाती घेतला. त्या वेळी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला होता. शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात होता.

Pune Rain News: दुपारपासूनच अंधारून आलं अन् पुण्यात कोसळधार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मात्र, मावळ तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला. त्यांच्या मते, जलवाहिनीमुळे स्थानिकांच्या पाणीहक्कांवर परिणाम होऊ शकतो आणि भविष्यात परिसराच्या हिताला धक्का बसू शकतो.या आंदोलनाचा परमोच्च बिंदू ९ ऑगस्ट २०११ रोजी बौर गावाजवळ पाहायला मिळाला. आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात तीन आंदोलकांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले आणि शेकडो नागरिक व शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेनंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि प्रकल्प स्थगित करण्यात आला.

 

बदललेली राजकीय समीकरणे

२००९ ते २०२६ या काळात महाराष्ट्रातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्या वेळी या प्रकल्पाला विरोध करणारे अनेक नेते आज सत्तेचा भाग आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या भाजप, यांचा राष्ट्रवादी गट आणि यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना सत्तेत असल्याने शासनाची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोहागड किल्ल्यावर ‘सिया पॉइंट’ची क्रेझ; व्हायरल ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, पर्यटनात २५ टक्क्यांनी वाढ

स्थानिक नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

मावळचे आमदार यांनी यापूर्वी, “शेतकऱ्यांशी चर्चा करूनच भूमिका ठरवू; शेतकऱ्यांचा विरोध असेल तर माझाही विरोध राहील,” असे स्पष्ट केले होते. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत ते या भूमिकेवर ठाम राहतात की शासनाच्या निर्णयासोबत जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच खासदार , माजी राज्यमंत्री आणि इतर स्थानिक नेत्यांची भूमिका देखील निर्णायक ठरणार आहे.

 

मावळात सुरू झालेली राजकीय चर्चा

मावळमध्ये सध्या एका वेगळ्याच राजकीय चर्चेला उधाण आले आहे. २००९ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा भाजपसह अनेक स्थानिक नेते आणि शेतकरी संघटना प्रकल्पाच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. २०११ मधील गोळीबारानंतर या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय खापर मोठ्या प्रमाणात अजित पवार यांच्या नेतृत्वावर फोडण्यात आले होते.मात्र, आज बदललेल्या राजकीय परिस्थितीत त्याच प्रकल्पाला पुन्हा चालना देण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मावळ तालुक्यात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, पूर्वी विरोधाची भूमिका घेणाऱ्या अनेक राजकीय शक्ती आज सत्तेत सहभागी असल्याने, या प्रकल्पाबाबत त्यांची भूमिका काय असेल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

पुन्हा आंदोलनाची शक्यता?

स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा विरोध अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शासनाने प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यास मावळात पुन्हा मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दुसरीकडे, पिंपरी-चिंचवड शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेता तेथील लोकप्रतिनिधी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसत आहे.

 

आगामी काळ निर्णायक

३ जुलैच्या बैठकीनंतर शासन प्रकल्पाला पुढे नेण्याचा निर्णय घेते की स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी नव्याने संवाद साधण्याचा मार्ग स्वीकारते, हे स्पष्ट होईल. मात्र, २००९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मावळच्या जनआंदोलनात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावर पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Punemaval pavana pipeline project restart pimpri chinchwad water supply meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • maval news
  • PCMC News
  • Water supply

संबंधित बातम्या

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
1

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
2

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त
3

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट
4

Ulhas River: उल्हास नदीतील गढूळता वाढली; बदलापूर-अंबरनाथमध्ये पाणीपुरवठ्यावर संकट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.