Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाखोंचा खर्च अन् हाती निराशा; मागणी घटल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात

गॅस टंचाईमुळे अनेक ढाबे व हॉटेल बंद असल्याने टोमॅटोची मागणी घटली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असून, उत्पादकांना फटका बसत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 24, 2026 | 02:52 PM
लाखोंचा खर्च अन् हाती निराशा; मागणी घटल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात

लाखोंचा खर्च अन् हाती निराशा; मागणी घटल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात

Follow Us
Follow Us:

मंचर : गॅस टंचाईमुळे अनेक ढाबे व हॉटेल बंद असल्याने टोमॅटोची मागणी घटली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असून, उत्पादकांना फटका बसत आहे. टोमॅटोला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

 

दरम्यान, गॅस टंचाईमुळे अनेक ढाबे व हॉटेल बंद असल्याने टोमॅटोची मागणी घटली आहे. याचा थेट परिणाम बाजारभावावर होत असून, उत्पादकांना फटका बसत आहे. बाजारात पुरवठा वाढला असला तरी मागणी कमी असल्यामुळे दरात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चिंतेत असून शासनाने दर स्थिर ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

“गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल काही दिवस बंद ठेवावे लागणार आहेत. त्यामुळे भाजीपाला खरेदी कमी झाली. टोमॅटोची मागणी घटल्याने बाजारभावही खाली आला, याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर झाला आहे. -डॉ.शांताराम महादेव गावडे,शेतकरी निरगुडसर.

याबाबत बोलताना लांडेवाडी येथील नवनाथ बाजीराव विश्वासराव म्हणाले, मी विश्वासराव मळ्यात साडे २२ गुंठ्यात ‘साहू’ जातीच्या टोमॅटोची लागवड केली आहे. या शेतीतून साधारण शंभर ते सव्वाशे कॅरेट उत्पादन मिळत असून सध्या वीस किलो टोमॅटोला प्रतवारी नुसार १०० ते २२० रुपये दर मिळत आहे. टोमॅटो पिकासाठी मजुरी, रोप लागवड, काढणी, खत, औषधे आदींसाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च झाला आहे. मात्र आतापर्यंत केवळ ७० ते ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, अजूनही मुद्दल वसूल झालेले नाही.

टोमॅटो उत्पादनासाठी खर्च मोठ्या प्रमाणात झाला, पण दर मिळत नाहीत. उत्पादन चांगले असूनही उत्पन्न कमी मिळत आहे. अजून अनेक शेतकऱ्यांची मुद्दलही निघाली नाही. अशीच परिस्थिती राहिली तर शेती करणे अवघड होईल. -सुरेशराव टाव्हरे, अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती निरगुडसर.

हे सुद्धा वाचा : पुणे ‘झेड’पी विषय समित्यांच्या सभापतींची निवड या महिन्यात होणार; पारदर्शक प्रक्रिया पार पडणार

जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरीही संकटात

पुणे जिल्ह्यातील ‘कांद्याचे आगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एकेकाळी समृद्धीचे प्रतीक असलेला उन्हाळी कांदा आज शेतकऱ्यांसाठी तोट्याचा व्यवहार ठरत आहे. ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला प्रतिकिलो अवघे ९ ते १२ रुपये इतकाच दर मिळत आहे. या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

Web Title: Tomato farmers are in trouble due to the decline in demand for tomatoes in the market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • tomato
  • Tomato Market

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
3

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.