Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस! अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, ‘काही झाल्यास प्रशासन जबाबदार’

Manjari Tribal Students Protest: मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या बेमुदत उपोषणाचा तेरावा दिवस असून, एका आंदोलक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 25, 2026 | 03:17 PM
आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस! अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, ‘काही झाल्यास प्रशासन जबाबदार’

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस! अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, ‘काही झाल्यास प्रशासन जबाबदार’

Follow Us
Follow Us:
  • आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस
  • आंदोलकाची प्रकृती बिघडली
  • सरकारच्या भूमिकेवर संताप
Manjari Tribal Students Protest: मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज तेरावा दिवस आहे. 2011 मध्ये सरकारने घेतलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासह जवळपास 40 मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. मात्र, इतके दिवस उलटूनही मागण्यांवर ठोस तोडगा निघालेला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप वाढत आहे. सरकार आंदोलनाची अपेक्षित दखल घेत नसल्याचा आरोपही आंदोलक विद्यार्थ्यांनी केला आहे.

आंदोलक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

दीर्घकाळ सुरू असलेल्या उपोषणादरम्यान मांजरीतील एका आंदोलक विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेनंतर आंदोलन करणारे विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आहेत. मागण्या पूर्ण न केल्यास आणखी विद्यार्थी उपोषणात सहभागी होतील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. तसेच उपोषणादरम्यान एखाद्या विद्यार्थ्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल, अशी भूमिकाही विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

पश्चिम विदर्भाच्या विकासाचा मुद्दा ऐरणीवर; नियोजन मंडळ स्थापनेची मागणी

राहुल गांधींनी उपस्थित केला विद्यार्थ्यांचा प्रश्न

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर या आंदोलनाकडे राजकीय पातळीवरही लक्ष वेधले गेले. त्यानंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी भागातील आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांकडून घेतली जात आहे.

नांदेडमध्येही आदिवासी विद्यार्थी रस्त्यावर

मांजरीतील आंदोलनासोबतच नांदेडमध्येही आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन करत विविध मागण्या सरकारसमोर ठेवल्या. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा, 14 ऑगस्ट रोजी शासनाने काढलेला जीआर रद्द करावा, आदिवासी वसतिगृहांमध्ये चांगल्या दर्जाच्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबांना मदतीची मागणी

आदिवासी विद्यार्थ्यांनी सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांचा मुद्दाही उपस्थित केला आहे. संबंधित मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमधील सोयी-सुविधांचा दर्जा सुधारावा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणीही आंदोलनातून करण्यात आली आहे.

‘मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र’

मांजरीतील बेमुदत उपोषणाचा कालावधी वाढत असतानाच आंदोलकांच्या प्रकृतीचा प्रश्न गंभीर होत आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय झाला नाही तर आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात येईल आणि अधिक विद्यार्थी उपोषणाला बसतील. मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नांदेडमधील आंदोलक विद्यार्थ्यांनीही दिला आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार आणि आदिवासी विकास विभाग आता कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Tukaram Mundhe: आता क्रिकेटच्या मैदानाबाहेर FDAची ‘धडाकेबाज बॅटिंग’! MCAच्या फूड आउटलेट्सवर मुंढेंची कारवाई

Web Title: Tribal students indefinite hunger strike manjari protest demands ashok uike resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • Students

संबंधित बातम्या

BPSC Students Protest: पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी
1

BPSC Students Protest: पाटण्यात BPSC अभ्यर्थी रस्त्यावर; 15 विद्यार्थी संघटनांचा मोर्चा, पेपर लीकच्या चौकशीसह फेरपरीक्षेची मागणी

Dharashiv News: वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई
2

Dharashiv News: वीजचोरी ते फिडर ट्रिपिंग; महावितरणचा अधिकाऱ्याला दणका! अधीक्षक अभियंता संजय आडे यांच्यावर निलंबनाची कारवाई

‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर…’, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा
3

‘महाराष्ट्रात राहायचं असेल तर…’, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या आंदोलनावरून वाद पेटला; मराठी एकीकरण समितीने दिला थेट इशारा

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम
4

समुद्राच्या तळाशी दडलेला इतिहास उलगडणार! विजयदुर्ग, जंजिरासह देशातील ५ ठिकाणी पुरातत्व विभागाची शोधमोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.