Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर ‘या’ तारखेला प्रत्यक्ष बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत घेणार आढावा

चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था, वाढती वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योजकांसमोर निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्योगमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 13, 2026 | 05:59 PM
चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर 'या' तारखेला प्रत्यक्ष बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत घेणार आढावा

चाकणमधील उद्योजकांच्या प्रश्नांवर 'या' तारखेला प्रत्यक्ष बैठक; उद्योगमंत्री उदय सामंत घेणार आढावा

Follow Us
Follow Us:

पुणे : चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांची दुरवस्था, वाढती वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे उद्योजकांसमोर निर्माण झालेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दिनांक १६ ऑगस्ट रोजी चाकण येथे उद्योजक आणि विविध औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष बैठक आयोजित करण्यात आली आहे. उद्योगांचे महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतर होण्याची शक्यता व्यक्त होत असताना या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

उद्योगमंत्री सामंत यांनी गुरुवारी चाकणमधील औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून येथील परिस्थितीची प्राथमिक माहिती घेतली. उद्योजकांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने दिनांक १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता चाकण येथे ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. चाकण परिसरातील उद्योगांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

उद्योजकांच्या अडचणी जाणून घेणार

रस्त्यांची स्थिती, वाढती वाहतूक कोंडी, मालवाहतुकीतील अडथळे व अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांबाबत उद्योजकांच्या अडचणी सविस्तरपणे जाणून घेतल्या जातील. संबंधित सर्व शासकीय विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधून या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन उद्योगमंत्री सामंत यांनी दिले.

हे सुद्धा वाचा : पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?

औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी समस्या मांडणार

चाकण परिसरातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी शासन आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यात प्रभावी समन्वय असणे आवश्यक असून, दिनांक १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आपल्या समस्या आणि मागण्या उद्योगमंत्र्यांसमोर मांडणार आहेत.

चाकणमधील उद्योजक आक्रमक

चाकण एमआयडीसीतील जवळपास वीस लघुउद्योगांनी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांना कंटाळून आपला उद्योग स्थलांतरीत करण्याची तयारी केली आहे. येथील उद्योजक आणि त्यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन पत्रकार परिषदेत येथील दुरवस्थेबाबत आक्रमक भुमिका मांडली. मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे १५ ते ३० दिवसांत बुजवावेत, रस्तेनिहाय कामाचे वेळापत्रक जाहीर करावे, ‘चाकण रोड सेल’ स्थापन करून तक्रारींसाठी एक खिडकी व्यवस्था करावी, अतिक्रमणे हटवावीत आणि ट्रकसाठी स्वतंत्र टर्मिनल उभारावेत, अशी मागणी उद्योग प्रतिनिधींनी केली. याशिवाय पथदिवे, सीसीटीव्ही आणि वाहतूक वॉर्डनची नियुक्ती करण्याची मागणीही करण्यात आली.

Web Title: Uday samant is going to hold a meeting regarding the issues faced by entrepreneurs in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • Uday Samant

संबंधित बातम्या

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी
1

पाच वर्षांत राज्यातील 36211 कंपन्यांना टाळे, मुंबईत सर्वाधिक कंपन्या बंद; वाचा सविस्तर आकडेवारी

चाकणमधील उद्योजक आक्रमक; 15 ते 30 दिवसांत एमआयडीसीतील रस्ते दुरुस्तीची मागणी
2

चाकणमधील उद्योजक आक्रमक; 15 ते 30 दिवसांत एमआयडीसीतील रस्ते दुरुस्तीची मागणी

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती
3

बारामतीत ‘बुलेट’ चोरट्यांचा धुमाकूळ, तीन बुलेट लंपास; CCTV फुटेज पोलिसांच्या हाती

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…
4

मोशी दुर्घटनेतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना 55 लाखांची मदत; नोकरी, मोफत शिक्षण अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.