Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri: गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण; ‘पुढील 2 वर्षांमध्ये…’, काय म्हणाले उदय सामंत?

Ratnagiri: हॉटेल व फळप्रक्रिया या व्यवसायांना उद्योगांचा दर्जा द्यायचा आहे. असा दर्जा दिला तर त्यात अमूलाग्र बदल होईल. पुढील दोन वर्षांत पर्यटनाची माहिती देणारे पर्यटन विकास केंद्रही विकसित करणार आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 28, 2026 | 03:52 PM
Ratnagiri News

Ratnagiri News

Follow Us
Follow Us:
  • गोव्याप्रमाणे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे आकर्षण
  • गणेशोत्सवात ९० ते ९५% हॉटेल्स फुल्ल
  • कोकणच्या उत्पादनांसाठी ६ विशेष स्टॉल्स
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा आता गोव्याप्रमाणेच पर्यटकांना आकर्षित करत आहे. विकासासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. हॉटेल व फळप्रक्रिया या व्यवसायांना उद्योगांचा दर्जा द्यायचा आहे. असा दर्जा दिला तर त्यात अमूलाग्र बदल होईल. पुढील दोन वर्षांत पर्यटनाची माहिती देणारे पर्यटन विकास केंद्रही विकसित करणार आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. हॉटेल विवा येथे रविवारी रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्था मर्यादित, समृद्ध मराठी चेंबर्स ऑफ कॉमर्स (मुंबई), पर्यटन संचालनालयातर्फे जागतिक पर्यटनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, इन्फिगो आय
केअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकुर आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवात ९० ते ९५% हॉटेल्स फुल्ल
मंत्री सामंत यांनी राजू भाटलेकर यांचे अभिनंदन केले. सातत्याने पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणारे भाटलेकर पर्यटन परिषद, कार्यशाळा घेऊन व्यासपीठ देत असल्याचे सांगून मंत्री म्हाणाले की, रत्नागिरीत दिवाळी. ३१ डिसेंबर, शिमगा, गणपती उत्सव आदी काळात हॉटेल्सची ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत हॉटेल्स फुल्ल होती. रत्नागिरीत विमानतळ होणार का? यावर एकेकाळी शंका उपस्थित करून टीका केली जात होती.

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा

मात्र १०० कोटी रुपये खर्च करून येथील एअरस्ट्रिपची लांबी १४०० मीटरवरून २१०० मीटर, रुंदी ३० मीटरवरून ४५ मीटर करण्यात आली आहे. येथे ८२ सीटर एटीआर विमान सहज उतरू शकेल, जेणेकरून पर्यटनाला अधिक गती मिळेल, उडाण योजनेअंतर्गत देशात कुठेही पाहायला मिळणार नाही, अशी सुसज्ज टर्मिनल बिल्डिंग रत्नागिरीत उभारण्यात आली आहे. या इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकणी सरकलीचे दर्शन घडते

कोकणच्या उत्पादनांसाठी ६ विशेष स्टॉल्स
टर्मिनल बिल्डिंगमध्ये कोकणच्या उत्पादनांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी ६ विशेष स्टॉल्स (स्टैंड्स) तयार करण्यात आले आहेत. याद्वारे मुंबई किंवा इतर ठिकाणांहून येणाऱ्या पर्यटकांना कोकम सरबत आणि सोलकढी यांसारख्या स्थानिक पदाथांची ओळख होईल. रत्नागिरी विमानतळावरून आगामी जानेवारीच्या पहिल्या आठवडयात मुंबई आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होणार असून, नागरिक विमानाने प्रवास करू शकतील, अशी घोषणा मंत्री सामत यांनी या वेळी केली.

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

प्रास्ताविकात सुधीर तथा भाई रिसबूड यांनी कोकणचे पर्यटन, रत्नागिरीत पर्यटन वाढीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या कलाकृती, प्रकल्पांबाबत माहिती दिली. फक्त संकल्पना मांडून नाही तर तर प्रत्यक्षात अमलबजावणी करण्यावर पालकमंत्र्यांचा भर असतो, असे आवर्जुन सागितले, सूत्रसंचालन राजेश आयरे यानी केले.

Web Title: Minister uday samant statement about ratnagiri district tourism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 03:52 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • tourism
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड
1

Weather : उत्तर भारतातील ‘या’ शहरात वाढलीय थंडी, लोकरीचे कपडे विकत घेण्यास पर्यटकांची झुंबड

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा
2

Ratnagiri News: रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागात समावेशासाठी पाठपुरावा; उदय सामंतांची घोषणा

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी
3

वर्षातून एकदाच व्हिएतनाममध्ये भरतो Love Market, एक्सला भेटायला इथे होते लोकांची गर्दी

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन
4

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त रत्नागिरीसाठी उदय सामंतांचा मास्टर प्लॅन; चारा-पाणी ते कर्ज पुनर्गठन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.