Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ताधाऱ्यांची चार तास कोंडी; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात ‘एकजूट’

राष्ट्रवादी (पवार गट) केवळ एक सदस्य आणि शिवसेना (ठाकरे गट) सहा सदस्य या गटाने इतर पक्षांच्या सदस्यांसोबत मिळून प्रभावी राजकीय दबाव निर्माण केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2026 | 03:00 PM
सत्ताधाऱ्यांची चार तास कोंडी; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात ‘एकजूट’

सत्ताधाऱ्यांची चार तास कोंडी; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात ‘एकजूट’

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गुरुवारी (दि.१६) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मोठ्या राजकीय कोंडीचा सामना करावा लागला. विषय समित्यांच्या सदस्य निवडीच्या प्रक्रियेदरम्यान विरोधकांसह इतर सदस्यांनी एकत्र येत भूमिका घेतल्याने सत्ताधाऱ्यांची तब्बल चार तास कोंडी झाली.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वतंत्र सत्ता असली तरी या सभेत मात्र त्यांच्या विरोधात अनपेक्षित राजकीय एकजूट दिसून आली. भाजप, शिवसेना (शिंदे गट) तसेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या सदस्यांनी एकत्र येत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची ताकद मर्यादित असतानाही कॉंग्रेसचा एकही सदस्य नाही, राष्ट्रवादी (पवार गट) केवळ एक सदस्य आणि शिवसेना (ठाकरे गट) सहा सदस्य या गटाने इतर पक्षांच्या सदस्यांसोबत मिळून प्रभावी राजकीय दबाव निर्माण केला.

विषय समित्यांच्या निवडीसारख्या नियमित प्रक्रियेत अचानक बदललेल्या या समीकरणामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सत्ताधाऱ्यांना आपली भूमिका ठामपणे मांडण्यासाठी वारंवार चर्चा, सल्लामसलत आणि अंतर्गत बैठका घ्याव्या लागल्या. मात्र, एकमत होत नसल्याने निर्णय प्रक्रियेला विलंब झाला आणि ही कोंडी तब्बल चार तास कायम राहिली.

Kolhapur News : धान्य साठवणूक योजनेत महाराष्ट्र अग्रेसर; कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांत उभारणार सर्वात मोठं ‘कोठार’

या घडामोडींमुळे पुणे जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची पकड आव्हानासमोर उभी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवरील बदलती राजकीय गणिते आणि सदस्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे सत्ताधाऱ्यांना पुढील काळात अधिक सावध भूमिका घ्यावी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Web Title: Unity against ncp in pune zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?
1

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
2

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
3

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.