Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास…; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पाईप नॅचरल गॅस (PNG) ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाढती गरज ओळखून नागरिकांना तात्काळ नवीन कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 03, 2026 | 02:22 PM
एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास...; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या, मनुष्यबळाची आवश्यकता असल्यास...; चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Follow Us
Follow Us:
  • एमएनजीएलचे कनेक्शन तात्काळ उपलब्ध करुन द्या
  • लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करुन देऊ
  • चंद्रकांत पाटलांचे अधिकाऱ्यांना निर्देश
पुणे : युद्धामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पाईप नॅचरल गॅस (PNG) ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाढती गरज ओळखून नागरिकांना तात्काळ नवीन कनेक्शन उपलब्ध करून देण्याचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तसेच, मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यास लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे नैसर्गिक गॅसच्या मागणीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील यांनी एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. कोथरुड विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण पुणे शहरात पीएनजी पुरवठा विनाव्यत्यय सुरू राहण्याबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी एमएनजीएलचे डायरेक्टर कुमार शंकर, कमर्शियल डायरेक्टर शंकर करजगी, स्वतंत्र डायरेक्टर बागेश्री मंठाळकर, व्हाईस प्रेसिडेंट शत्रुघ्न सिंह, रितेश इंगोले, ओंकार डुबल, लोकेश सरोदे आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला पाटील यांनी एमएनजीएलच्या शहरातील पुरवठा, तांत्रिक अडचणी याबबतचा सविस्तर आढावा घेतला. तसेच, मागणी आणि पुरवठ्याबाबतही सविस्तर माहिती जाणून घेतली. युद्धजन्य परिस्थितीमुळे अचानक मागणी वाढल्याने नागरिकांशी समन्वय साधून भागांत पाईप लाईन पोहोचवण्याचे काम जलदगतीने पुरवावे. तसेच, कामाला गती देण्यासाठी जर मनुष्यबळाची कमतरता भासत असेल, तर लोकसहभागातून १०० कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हे सुद्धा वाचा : खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी

महाराष्ट्रात गॅस टंचाईचा भडका

सध्या जागतिक स्तरावर अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या वाढत्या तणावाचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात दिसू लागले आहेत. मुंबई, नागपूर, अमरावती आणि जळगाव यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईतील मालाडमधील मालवणी हा अत्यंत दाट वस्तीचा परिसर सध्या गॅस टंचाईचा केंद्रबिंदू ठरला आहे. गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगेत आपले सिलिंडर चोरीला जाऊ नयेत किंवा कुणी रांगेतील क्रम बदलू नये, यासाठी नागरिकांनी साखळदंडाने ४-५ सिलिंडर एकत्र बांधून त्यांना कुलूप लावले आहे. अनेक नागरिक रात्री १० वाजेपासूनच रस्त्यावर रांगा लावून बसत आहेत. यात महिलांची संख्या मोठी असून, घरकाम आणि मजुरी सोडून त्यांना भर उन्हात उभे राहावे लागत आहे.

Web Title: Chandrakant patil has ordered the officials to make mngl connections available immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 02:18 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • Gas Cylinder
  • pune news

संबंधित बातम्या

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
1

चाकण-हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी डुडी यांनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद
2

पुण्यात पुन्हा पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी ठेवणार बंद

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत द्या’; प्रशासनाला शेतकऱ्यांची आर्त हाक
3

‘आश्वासन नको, प्रत्यक्ष मदत द्या’; प्रशासनाला शेतकऱ्यांची आर्त हाक

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण
4

Pune Teachers Voter List : मतदारयादीत ‘बॉम्बस्फोट’! मतदाराच्या नावाचा ‘बॉम्बस्फोट’ म्हणून उल्लेख, मतदार यादी पाहून सगळेच हैराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.