Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनोरीत रस्त्याला २० लाख खर्च तरीही खड्डेच; बांधकाम अभियंत्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

सोनोरी गावात लाखो रुपयांच्या विकासकामांचा डोंगर उभा केल्याचे राजकीय पटलावरून सांगितले जात असले तरी त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून कामे मात्र अत्यंत निकृष्ट होत असल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 19, 2026 | 06:03 PM
सोनोरीत रस्त्याला २० लाख खर्च तरीही खड्डेच; बांधकाम अभियंत्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

सोनोरीत रस्त्याला २० लाख खर्च तरीही खड्डेच; बांधकाम अभियंत्यावर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

Follow Us
Follow Us:

सासवड : सोनोरी गावात लाखो रुपयांच्या विकासकामांचा डोंगर उभा केल्याचे राजकीय पटलावरून सांगितले जात असले तरी त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून कामे मात्र अत्यंत निकृष्ट होत असल्याचे समोर आले आहे. शाळेच्या दोन वर्ग खोल्या आणि दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल एक कोटीचा चुराडा केल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. त्यानंतर आता केवळ २०० मीटर रस्त्याच्या कामासाठी तब्बल २० लाख रुपये खर्च करूनही खड्डे मात्र तसेच असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक आहेत.

 

सासवड सोनोरी रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून आले असून या कामांचा दर्जा न तपासता पैसे काढून देणाऱ्या अभियंत्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. सासवड सोनोरी या रस्त्यावरील ३ मीटर रुंदी आणि २०० मीटरची लांबी असलेल्या सिमेंट कॉन्क्रेटच्या कामासाठी तब्बल २० लाख रुपये आले असून ठेकेदाराने बांधकाम विभागाच्या अभियंत्याशी संगनमत करून काम न करताच पैसे काढल्याचा जोरदार आरोप केला आहे.

दोन्ही कामांचा ठेकेदार गावातीलच

शाळेचे काम मूळ ठेकेदार सुधीर कातोरे याने घेतले असून, बांधकाम गावातील पोट ठेकेदार नितीन काळे याच्याकडून करून घेतले आहे. त्याच पद्धतीने रस्त्याचे काम शिवरी येथील किरण कामथे या ठेकेदाराने घेतले, मात्र त्यांने स्वतः काम न करता पूर्वीचाच पोट ठेकेदार नितीन काळे यास काम दिले असून ३ मीटर रुंदी आणि २०० मीटर लांबीच्या कामासाठी २० लक्ष रुपये मिळाल्याचे पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता संतोष नलावडे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे कामांचा दर्जा न तपासता पैसे वर्ग करून टक्केवारीतून मलिदा खाणारे अभियंता नलावडे हेच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले असून त्यांचीच खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी आरपीआयचे (आठवले) तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी

जिल्हा नियोजन मधून पंचायत समितीच्या माध्यमातून २०० मीटरच्या रस्त्यासाठी २० लाख मंजूर आहेत. अद्याप रस्त्याच्या साईड पट्ट्या भरायच्या असून काही काम करायचे बाकी असल्याची माहिती पंचायत समितीचे बांधकाम उप अभियंता संतोष नलावडे यांनी दिली आहे. तर अधिकारी खोटे बोलत असून त्यांनी पूर्ण बिले काढली आहेत. त्यामुळे संतोष नलावडे यांची खातेनिहाय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आरपीआयचे (आठवले) तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे यांनी केली आहे.

Web Title: Villagers have become aggressive over roadwork in sonori village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 06:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • RPI
  • Saswad News

संबंधित बातम्या

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता
1

शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने फिरवली पाठ, सोयाबीनची वाढ खुंटली; उत्पादन घटण्याची शक्यता

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल
2

व्हीआयपी दौऱ्याने लोणावळ्याचे रस्ते झाले मोकळे! सर्वसामान्यांसाठी हीच तत्परता कधी? नागरिकांचा सवाल

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
3

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
4

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.