Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : राज्यात पुढील 4-5 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबई, रायगडसह काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास जाणवू शकतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 15, 2026 | 09:08 AM
राज्यात पुढील 4-5 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबई, रायगडसह काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

राज्यात पुढील 4-5 दिवस वादळी पावसाचा इशारा; मुंबई, रायगडसह काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी

Follow Us
Follow Us:
  • राज्यात उन्हाचा कडाका वाढतोय
  • वादळी पावसासाठी निर्माण होतंय पोषक वातावरण 
  • सोलापूर, कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
पुणे : सध्या राज्यात उन्हाचा कडाका वाढताना दिसत आहे. या वाढत्या उन्हामुळे घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. ‘ऑक्टोबर हिट’चा फटका बसत असतानाच आता हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास जाणवू शकतो. त्याचवेळी राज्याच्या विविध भागांत पुढील 4 ते 5 दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात एकीकडे उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. तर दुसरीकडे वादळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. राज्यातील अनेक भागांत गुरुवारी (दि.15) उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या विविध भागांत पुढील 4 ते 5 दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांतील नागरिकांना उन्हाच्या झळांसोबतच पावसाचाही सामना करावा लागू शकतो. राज्यात कमाल तापमानात वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा सातत्याने 36 अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदवला जात आहे.

दिवसा वाढणारा उन्हाचा चटका आणि दमट हवामान यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये उष्णतेसोबत आर्द्रतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

सोलापूर, कोल्हापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास जाणवू शकतो.

पाऊस पडण्यासाठी पोषक हवामान तयार

राज्यात सध्या विजांसह पाऊस पडण्यासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा अनुभवायला मिळू शकतो. मात्र, पावसाचे स्वरूप आणि तीव्रता जिल्ह्यानुसार वेगवेगळी असू शकते.

राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना गोसेखुर्द तुडुंब; पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यांच्या पाणी नियोजनाला मिळणार दिलासा

Web Title: Warning of thunderstorms and rain in maharashtra for the next 4 5 days nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज
1

Weather Update : ‘ऑक्टोबर हिट’चा तडाखा कमी होणार; राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
2

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

केंद्राकडून राज्यातील दुष्काळाचा आढावा; परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथक महाराष्ट्रात
3

केंद्राकडून राज्यातील दुष्काळाचा आढावा; परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पथक महाराष्ट्रात

Weather Update : महाराष्ट्रातून पावसाची अखेर एक्झिट; पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी…
4

Weather Update : महाराष्ट्रातून पावसाची अखेर एक्झिट; पुढील तीन ते चार दिवसांत देशाच्या आणखी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.