Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water News: पुण्यातील ‘या’ भागात पाण्याचा प्रश्न गंभीर; अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विधानसभाध्यक्षांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पाण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 29, 2025 | 09:49 PM
Pune Water News: पुण्यातील 'या' भागात पाण्याचा प्रश्न गंभीर; अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

Pune Water News: पुण्यातील 'या' भागात पाण्याचा प्रश्न गंभीर; अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

Follow Us
Follow Us:

पुणे: वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विधानसभाध्यक्षांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वडगाव शेरीतील पाण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे, मात्र हा अहवाल खोटा असून नागरिकांना पाण्याची समस्याच ही भेडसावतच आहे. असा गंभीर आरोप वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी आज खराडीत केला.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी चंदन नगर भागातील पाण्याच्या टाकीसमोर सामाजिक कार्यकर्ते संकेत गलांडे उपोषणाला बसले होते. त्यावेळी या भागातील मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. दारात नळ आहे तसेच उशाला पाण्याच्या तीन टाक्या आहेत. तरी सुध्दा घशाला कोरड आहे. असे सांगून नेमके वडगाव शेरीच्या वाट्याचे पाणी कुठे मुरते आहे. असा प्रश्न उपस्थित करुन महापालिकेच्या विरोधात महिलांनी रोष व्यक्त केला.

महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

पठारे म्हणाले की, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून वडगाव शेरीत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्याचे राजकारण केले जात आहे. महापालिकेकडून पुरेशा प्रमाणात पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचे सांगितले जात आहे. परंतु नागरिकांपर्यंत पाणीच पोहचत नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेकवेळा विनंती अर्ज करुन झाले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिल्यांनतर अहवाल सादर करुन त्यांचीही दिशाभूल केली आहे. अद्याप पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते. परंतु या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस जलवाहिनीतून इतर भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने पाण्याची चोरी होत आहे. एक्सप्रेसला जलवाहिनी जोडता येत नाही. त्यामुळे ती बंद करुन वडगाव शेरीकरांना पाण्याचा पुरवठा सुरळीत करता येईल. येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले

घोरपडीतील व्हॉलमनची मनमर्जी

वडगावशेरी, खराडीत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचे मुळ कारण समोर आले आहे. लष्कर जलकेंद्रातून ७० एमएलडी पाण्याचा पुरवठा खराडी, वडगावशेरीला केला जातो. ताडीगुत्ता आणि घोरपडी येथील जलवाहिन्यांसाठी वॉल बसविण्यात आला आहे. ही जलवाहिनी एक्सप्रेस जलवाहिनी आहे. या वाहिनीला कायद्यानुसार जोड देवून इतर भागाला पाणी देता येत नाही. परंतु काही पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिळून बेकायदा जलवाहिनीला जोड देवून या भागासाठी जलवाहिनी जोडण्यात आली आहे. या भागाला दीड लाख लिटर पाणी दिले जाते. त्यानंतर वडगावशेरीला नियमानुसार पाणी मिळायला हवे. परंतु या भागातील व्हॉलमन परस्पर हा वॉल फिरवून पाणी वळवून एकप्रकारे चोरी करतात. घोरपडीतील व्हॉलमन त्यांची मनमर्जी करत आहेत. रात्री अपरात्री व्हॉल फिरवत आहेत. त्यामुळे वडगाव शेरी, खराडीतील पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. परिणामी या भागाला पाणी मिळत नाही. असे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

Web Title: Water problem in vadgaon sheri kharadi 4 to 5 months pune area marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Pune Water News

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
1

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
2

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
3

Ketan Agrawal Muder Case: दरीत ढकलण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे; पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
4

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.