Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; ५०० कोटींपैकी तब्बल ‘इतक्या’ रकमेचे वाटप पूर्ण

पुरंदर परिसरातील सात गावांमधील सुमारे ३,०४० एकर जमीन संपादनासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके नियुक्त केली आहेत. या पथकांकडून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 22, 2026 | 02:35 AM
Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग; ५०० कोटींपैकी तब्बल ‘इतक्या’ रकमेचे वाटप पूर्ण
Follow Us
Follow Us:

५०० कोटींपैकी ३०० कोटींचे वाटप पूर्ण
आणखी २ हजार कोटींची मागणी
पुरंदर विमानतळाच्या कामाला आला वेग

पुणे: पुणेकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती (Purandar Airport) संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प अखेर निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. भूसंपादनाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, राज्य शासनाकडून मिळालेल्या ५०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक निधीपैकी तब्बल ३०० कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा मानली जाणारी भूसंपादन प्रक्रिया आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भूसंपादनाचा वेग कायम राखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी राज्य शासनाकडे अतिरिक्त २ हजार कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. प्रशासनाच्या मते, पुढील टप्प्यातील जमीन संपादनासाठी मोठ्या निधीची आवश्यकता भासणार असून, निधी वेळेत उपलब्ध झाल्यास प्रकल्पाला आणखी वेग मिळणार आहे.

पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी 920 एकर जमिनीसाठी संमतीचे करार; मुळ शेतकऱ्यांना प्राधान्य

थेट संवादामुळे वाढला विश्वास

पुरंदर परिसरातील सात गावांमधील सुमारे ३,०४० एकर जमीन संपादनासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके नियुक्त केली आहेत. या पथकांकडून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जात असून, मोबदल्याची रक्कम आरटीजीएसद्वारे थेट खात्यात जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, संमतीपत्रे देण्याचे प्रमाणही वाढले आहे.

१० जूनपर्यंत संधी

शासनाने शेतकऱ्यांसाठी आकर्षक मोबदला पॅकेज जाहीर केले आहे. प्रति एकर १ कोटी ६१ लाख रुपये, विहिरी व फळबागांसाठी दुप्पट मोबदला तसेच प्रस्तावित एरोसिटीमध्ये १० टक्के विकसित भूखंड देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या लाभांसाठी १० जून २०२६ पर्यंत संमती देण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे.

Purandar Airport : विमानतळ प्रकल्पबाधित कर्जमाफीपासून राहणार वंचित; ‘या’ अटीमुळे पुरंदरच्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी

सक्तीच्या संपादनाचा इशारा

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, १० जूननंतर ज्या भागात मोठ्या प्रमाणात संमती मिळालेली असेल, त्या ठिकाणी कायद्यानुसार सक्तीचे भूसंपादन सुरू करण्यात येईल. विमानतळाच्या प्रत्यक्ष बांधकामाला ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरुवात करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

पहिल्या टप्प्यातील 500 कोटी पैकी 300 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे, भूसंपादन संमतीचा वेग वाढत असल्यामुळे दोन हजार कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

– जितेंद्र डुडी
जिल्हाधिकारी पुणे

 

Web Title: Work on purandar airport gains speed allocation of 300 crore out of 500 crore completed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • pune news
  • Purandar Airport
  • Purandar Farmers

संबंधित बातम्या

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार
1

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
2

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
3

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
4

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.