Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद क्षण! प्रा. विलास कथुरे यांचा ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कारा’ने सन्मान

Wrestling Award: शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्रा. विलास कथुरे यांनी कुस्ती खेळासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. ते भारतीय कुस्ती संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व जागतिक कुस्ती संघटनेचे निष्णात पंच आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 02, 2026 | 07:35 PM
major dhyanchand khel ratna award

major dhyanchand khel ratna award

Follow Us
Follow Us:
  • मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न जीवन गौरव पुरस्कार 
  • आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक प्रा. विलास कथुरे पुरस्काराने सन्मानित
  • प्रा. विलास कथुरे यांनी कुस्ती खेळासाठी आपले जीवन केले समर्पित 
पुणे/Wrestling: कुस्ती खेळासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच व प्रशिक्षक आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या क्रीडा विभागातील असिस्टंट डायरेक्टर प्रा. विलास कथुरे यांना नुकताच मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न जीवन गौरव पुरस्कार – २०२६ ने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी लिजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती, दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड व कालीरमन फाउंडेशन इंडिया यांच्यातर्फे हा सन्मान हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल, कराड) येथे प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भारताच्या लेकीचा कुस्तीत डंका! काजल पुन्हा विश्वविजेती; U20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सलग दुसरे ‘सुवर्ण’

शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्रा. विलास कथुरे यांनी कुस्ती खेळासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. ते भारतीय कुस्ती संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व जागतिक कुस्ती संघटनेचे निष्णात पंच आहेत. तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सहसचिव व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.

आशियाई कुस्ती स्पर्धा, राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा व जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक व जागतिक कुस्ती संघटनेचे निष्णात पंच म्हणून त्यांनी जवळपास २८ देशांमध्ये सहभाग घेतला आहे. ते गुरु द्रोणाचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला हिंदकेसरी पै. संतोष आबा वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, प्रा. संजय दुधाने, प्रा. नितीन शिंदे, प्रा. अमोल साठे, बाबा मते आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव

Web Title: Wrestling referee coach vilas kathure receives major dhyanchand maharashtra krida ratna achievement award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • Major Dhyan Chand Khel Ratna Award
  • pune news
  • Wrestler

संबंधित बातम्या

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?
1

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम
2

Sportsfield Monsoon League: विजय ॲकॅडमीची हॅटट्रिक, तर इकोल स्पोर्ट्सची विजयी घोडदौड कायम

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता
3

Maharashtra Breaking News Today 2026:  कच्च्या तेलाच्या वाढीमुळे जागतिक बाजारात चिंता

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी
4

‘पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर’ प्रकल्पाची ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.