Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीत वीजपुरवठ्यावरून युगेंद्र पवार आक्रमक; सायंकाळी फोर्स लोडशेडिंग थांबवण्याची मागणी

बारामती शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार आक्रमक झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 25, 2026 | 04:01 PM
बारामतीत वीजपुरवठ्यावरून युगेंद्र पवार आक्रमक; सायंकाळी फोर्स लोडशेडिंग थांबवण्याची मागणी

बारामतीत वीजपुरवठ्यावरून युगेंद्र पवार आक्रमक; सायंकाळी फोर्स लोडशेडिंग थांबवण्याची मागणी

Follow Us
Follow Us:

बारामती : बारामती शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज पदाधिकाऱ्यांसह बारामती येथील ऊर्जा भवन येथे महावितरणचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधत लेखी निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली.

ग्रामीण भागातील गावठाण फीडर व कृषीपंप वीजपुरवठ्यातील असमतोल, वारंवार होणारे लोडशेडिंग, तसेच सायंकाळी होणाऱ्या फोर्स लोडशेडिंगमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत युगेंद्र पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेषतः परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा विपरीत परिणाम आणि शेतकऱ्यांना वेळेवर पाणी न मिळाल्याने पिकांचे होणारे नुकसान याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

खांडज, पणदरे, माळेगाव व ढेकळवाडी यांसह आवश्यक त्या सर्व गावांमध्ये सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. शहर व ग्रामीण भागात दीर्घकाळ सुरू असलेले वीज भारनियमन ही केवळ तांत्रिक अडचण न राहता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि शेती व्यवसायावर गंभीर परिणाम करणारी समस्या बनल्याचेही त्यांनी नमूद केले. रोजच्या अतिरिक्त चार तासांच्या भारनियमनामुळे शेतकरी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले असून, विशेषतः सायंकाळच्या वेळेत वीज नसल्याने जनावरांची देखभाल, दूध काढणे, घरगुती कामे व मुलांचा अभ्यास विस्कळीत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असून, सातत्यपूर्ण व नियोजित वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून वीजपुरवठा स्थिर व विश्वासार्ह करावा,” अशी ठाम भूमिका युगेंद्र पवार यांनी मांडली.

मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनीही सर्व बाबी गांभीर्याने ऐकून घेत लवकरच योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुकाध्यक्ष ॲड. राजेंद्र जगताप, नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेत्या आरती शेंडगे-गव्हाळे, युवक शहराध्यक्ष ॲड. बळवंत बेलदार पाटील, युवक तालुकाध्यक्ष संदीप देवकाते, युवती शहराध्यक्षा राणी नवले, नितीन तावरे, पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष पैगंबर शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Yugendra pawar has become aggressive in the wake of irregular power supply in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • baramati
  • Sunetra Pawar
  • Yugendra Pawar

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध
2

‘५९ जातींचे गठबंधन तोडण्याचे षडयंत्र हाणून पाडा’; बारामतीतील एल्गारात उपवर्गीकरणाला तीव्र विरोध

14 वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा; मागासवर्गीय खंडकरी वारसाचा बारामतीत 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
3

14 वर्षांपासून जमिनीची प्रतीक्षा; मागासवर्गीय खंडकरी वारसाचा बारामतीत 15 ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
4

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.