Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बनपाव आणि त्याच्या आकाला जशास तसे उत्तर देणार’; युवा सेनेच्या जावळकरांचा इशारा

पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने साथ न दिल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला होता. या आरोपानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 30, 2026 | 01:20 PM
‘बनपाव आणि त्याच्या आकाला जशास तसे उत्तर देणार’; युवा सेनेच्या जावळकरांचा इशारा

‘बनपाव आणि त्याच्या आकाला जशास तसे उत्तर देणार’; युवा सेनेच्या जावळकरांचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • नवनाथ बन यांच्या आरोपांवर  जावळकरांचा पलटवार
  • शिंदेंची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप
  • ‘जशास तसे उत्तर देणार’; जावळकरांचा इशारा
पुणे : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत राजकीय वादाला तोंड फुटले आहे. पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने साथ न दिल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला होता. या आरोपानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आक्रमक झाले असून, युवा सेनेचे राज्य समन्वयक अनिकेत जावळकर यांनी नवनाथ बन यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

 

शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ‘बनपाव आणि त्याचा आका’ करत असल्याचा आरोप जावळकर यांनी केला. बनपावला भाजपने समज द्यावी. हा बनपाव रोज मोक्काट सुटलेला आहे. हा बनपाव शिवसेनेवर बोलत राहिला तर जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा जावळकरांनी दिला.

नेतृत्व मोठे होत असल्याने काहींच्या पोटात दुखते

अनिकेत जावळकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मोठे होत असल्याने काही लोकांच्या पोटात दुखत आहे. एखादा मराठी नेता मोठ्या उंचीवर पोहोचत असेल किंवा पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने वाटचाल करत असेल, तर त्याला कसे रोखता येईल, त्याचे नेतृत्व कसे दाबता येईल, यासाठी काही जणांकडून राजकारण केले जात आहे. पूर्णेकर प्रकरण असो किंवा जरांगे पाटील यांच्याशी संबंधित विषय, या घटनांच्या माध्यमातून शिंदे साहेबांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘प्रतिमा मलीन करण्याचे राजकारण करू नका’

पुढे बोलताना जावळकर यांनी नवनाथ बन यांना सुनावले की, स्वतःच्या कामातून नेतृत्व निर्माण करा. दुसऱ्याची प्रतिमा मलीन करून किंवा त्याचे नेतृत्व संपवून मोठे होण्याचा प्रयत्न करू नका. अशा प्रकारचे राजकारण यापुढे खपवून घेतले जाणार नाही. आगामी काळात आम्हीही जशास तसे उत्तर देण्यास तयार आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

हे सुद्धा वाचा : 23 ऑक्टोबरला आईशी शेवटचे बोलणे, 28 ऑक्टोबरला मृतदेह आढळला; मुग्धा देशमुख प्रकरणाने खळबळ

‘शिवसैनिक आणि युवासैनिक शिंदे साहेबांच्या पाठीशी’

एकनाथ शिंदे हेच आगामी काळात मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास व्यक्त करत जावळकर म्हणाले की, त्यांच्या पाठीशी शिवभक्त, हिंदुत्ववादी विचारांचे कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या ठामपणे उभ्या आहेत. अहोरात्र, अगदी मध्यरात्रीसुद्धा शिंदे साहेबांसोबत काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्ही कोणाचे नेतृत्व दाबण्यासाठी किंवा कोणाला संपवण्यासाठी राजकारण करत नाही. आम्ही कर्तृत्वाच्या मागे उभे राहणारे लोक आहोत, असे स्पष्ट करत अनिकेत जावळकर यांनी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अनिकेत जावळकर यांनी कोणावर टीका केली आहे?

    Ans: युवा सेनेचे राज्य समन्वयक अनिकेत जावळकर यांनी भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर टीका केली आहे.

  • Que: नवनाथ बन यांनी नेमका कोणता आरोप केला होता?

    Ans: पुण्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने साथ न दिल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला होता.

  • Que: अनिकेत जावळकर यांनी काय इशारा दिला आहे?

    Ans: शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न खपवून घेणार नाही. आगामी काळात अशा प्रयत्नांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जावळकर यांनी दिला.

Web Title: Yuva sena leader aniket jawalkar has strongly criticized navnath ban nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • pune news

संबंधित बातम्या

प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक
1

प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक

Navi Mumbai News: अहवाल येण्याआधीच अधिकाऱ्यांवर कारवाई! अवनी सोसायटी पुनर्विकास प्रकरणात सोमणाथ केकाण यांना प्रवेशबंदी
2

Navi Mumbai News: अहवाल येण्याआधीच अधिकाऱ्यांवर कारवाई! अवनी सोसायटी पुनर्विकास प्रकरणात सोमणाथ केकाण यांना प्रवेशबंदी

23 ऑक्टोबरला आईशी शेवटचे बोलणे, 28 ऑक्टोबरला मृतदेह आढळला; मुग्धा देशमुख प्रकरणाने खळबळ
3

23 ऑक्टोबरला आईशी शेवटचे बोलणे, 28 ऑक्टोबरला मृतदेह आढळला; मुग्धा देशमुख प्रकरणाने खळबळ

पुण्यात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सतर्क; बांधकामस्थळांना बजावण्यात आल्या नोटिसा
4

पुण्यात डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सतर्क; बांधकामस्थळांना बजावण्यात आल्या नोटिसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.