Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुन्हेगारी घटनांनी नागिरक हैराण; पाच जबरी चोरीचे तर एक दरोड्याचा गुन्हा

  • By युवराज भगत
Updated On: Mar 19, 2024 | 07:41 PM
धक्कादायक ! पैशांसाठी कोयत्याने हल्ला; तब्बल 3.80 लाख नेले लुटून, आरोपींना अटक

धक्कादायक ! पैशांसाठी कोयत्याने हल्ला; तब्बल 3.80 लाख नेले लुटून, आरोपींना अटक

Follow Us
Follow Us:

पुणे : वाढत्या गुन्हेगारी घटनांनी पुणेकर हैराण असून, शहरात तोडफोडीच्या घटना दहशत माजवत असतानाच जबरी चोरीच्या घटनादेखील सातत्याने घडत आहेत. या घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून, शहरात एका दिवसात जबरी चोरीचे पाच, तर एक दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

धक्कादायक, म्हणजे, स्वारगेट पोलीस लाईनमध्येच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आहे. सुदैवाने महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्या चोरट्याला पकडण्यात पोलीस ‘नशीबवान’ राहिले आहेत. परंतु, चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहे.

तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला

शिवाजीनगर येथील नाना-नानीपार्क येथून मोबाईवर गाणी ऐकत चालेल्या तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी फारूक कुतुबुद्दीन शेख (२३, रा. शिवाजीनगर) याने तक्रार दिली आहे. त्यावरून आकाश काळू मोघे (२२) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार १८ मार्च रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

जबरदस्तीने खिशातील ४ हजार २०० रुपयांची चोरी

दुसऱ्या घटनेत “तुला इथे धंदा करायचा असेल, तर महिन्याला हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत दोघांनी गचांडी पकडून हत्यार दाखवत जबरदस्तीने खिशातील ४ हजार २०० रुपये जबरी चोरी करून नेले. तसेच, आम्ही येथील भाई आहोत म्हणून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. भूप्रेंद्र शिंदे आणि सचिन मारणे यांना अटक केली आहे.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

तर दिनेश वांजळे नावाच्या एकावरही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत परेश ईश्वरदास भागचंदानी (वय ४२, रा. उत्तमनगर) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार १७ मार्चला रात्री सव्वा आठच्या सुमारास घडला. आरोपींच्या दहशतीमुळे व ते करीत असलेल्या शिवीगाळीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तसेच, पत्नीला शाळेच्या गेटवर थांबवून मुलाला शाळेत आणण्यासाठी गेल्यानंतर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेची 2 लाख ४० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर चंदननगर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार 18 मार्चला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खराडी येथील लिटील मिलेनियम स्कूल येथे घडला.

४५ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी जबरी चोरी

याबाबत २८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. देवाची उरूळी येथील जुन्या पालखी रस्त्याने पायी जाणार्‍या ३० वर्षीय महिलेची ४५ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी जबरी चोरी करून नेली. याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत ३० वर्षीय महिलने तक्रार दिली आहे. तसेच, स्वारगेट पोलीस लाईनमधील मोकळ्या ग्राउंडसमोरील रस्त्यावर भरदुपारी घडली आहे. ज्येष्ठ महिला दुपारी पायी जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांने त्यांची सोनसाखळी हिसका मारून चोरून नेली. यावेळी चोरट्यांने 66 हजारांची सोनसाखळी चोरी करून नेली. याघटनेत चोरट्याला अटक केली आहे.

सुरक्षारक्षकाला धमकावून चंदनचोरी
कोरगाव पार्क येथील एकांतिका अपार्टमेंटमधे शिरून सुरक्षा रक्षकाला तलवारीचा धाक दाखवत दरोडा टाकून सहा जणांच्या टोळक्याने चंदनाचे झाड कापून चोरून नेले. याप्रकरणी सहा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी १५ हजारांचे चंदनाचे झाड कापून चोरी करून नेले. राजाराम नारायण बोडू (57, रा. तुषार हौसिंग सोसायटी, ताडीवाला रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार १८ मार्च रोजी पहाटे तीन ते पावणे चारच्या सुमारास घडला.

Web Title: Punekar shocked by criminal incidents five cases of forcible theft and one case of robbery nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2024 | 07:41 PM

Topics:  

  • case of robbery
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस
1

आढावा बैठकीला गैरहजर, कामकाजही प्रलंबित; दोन सह दुय्यम निबंधकांना कारणे दाखवा नोटीस

फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा…; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा
2

फर्ग्युसन रोड अतिक्रमणमुक्त करा, अन्यथा…; नगरसेवक रविंद्र साळेगावकरांचा प्रशासनाला इशारा

Pathardi Robbery News: “पाथर्डीला जायचा रस्ता सांगा…” अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!
3

Pathardi Robbery News: “पाथर्डीला जायचा रस्ता सांगा…” अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!

सोमेश्वर कारखान्याने ऊसाला प्रतिटन 4 हजारांची पहिली उचल द्यावी; दिलीप खैरे यांची मागणी
4

सोमेश्वर कारखान्याने ऊसाला प्रतिटन 4 हजारांची पहिली उचल द्यावी; दिलीप खैरे यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.