Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar IT Park: पुरंदरला दीड हजार एकरावर होणार पुरंदर आयटी पार्क

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. शिवतारे यांनी प्रस्तावित केलेल्या पुरंदर आयटी पार्कबाबत २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 13, 2026 | 04:21 PM
Purandar IT Park, Pune IT News, Vijay Shivtare,

Purandar IT Park, Pune IT News, Vijay Shivtare,

Follow Us
Follow Us:
  • पुरंदर तालुक्यात आयटी पार्कवर आता शिक्कामोर्तब
  • आयटी कंपन्यांचे परराज्यात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर तालुक्यात आयटी पार्कला जागा देण्याची तयारी
  • शिवतारे यांनी प्रस्तावित केलेल्या पुरंदर आयटी पार्कबाबत २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता
Purandar IT Park: पुण्यातून आयटी कंपन्यांचे परराज्यात होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर तालुक्यात आयटी पार्कला जागा देण्याची तयारी आमदार विजय शिवतारे यांनी दर्शवली होती. त्या अनुषंगाने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी महसूल विभागाकडे प्रस्तावित ५७२ हेक्टर म्हणजेच जवळपास दीड हजार एकर जागा हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत आणि उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली आहे. आमदार विजय शिवतारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नावर ते बोलत होते.

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार अपघात की घातपात? ‘ब्लॅक बॉक्स’मध्ये छेडछाड होत असल्याचा रोहित पवारांचा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. शिवतारे यांनी प्रस्तावित केलेल्या पुरंदर आयटी पार्कबाबत २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली होती. पुढे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपलब्ध जागेचा अहवाल मागवला. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही तातडीने व्हावी अशी मागणी शिवतारे यांनी केली होती. त्यावर बोलताना उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक म्हणाले, पुण्यातील कंपन्यांचे वाहतूक कोंडी आणि अन्य समस्यांमुळे स्थलांतर होत असल्याची बाब चिंताजनक असल्याने शिवतारे यांची मागणी रास्त आहे. पुरंदर आयटी पार्कसाठी ३ एप्रिल २०२५ रोजी उद्योग मंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रादेशिक अधिकारी कार्यालयाकडून उद्योग विभागाला प्रस्ताव प्राप्त झालेला आहे. नुकतीच २७ फेब्रुवारी रोजी महसूल विभागाकडे या जागेची मागणी करण्यात आल्याचेही नामदार नाईक यांनी सांगितले. यावर जागा हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करावी आणि विधिमंडळात या आयटी पार्कची घोषणा करावी अशी मागणी शिवतारे यांनी केली.

मराठवाड्याची चिंता वाढली! उन्हाच्या तडाख्याने धरणांतील पाणीपातळी घटली; जायकवाडीत ७२% साठा शिल्लक

यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबतचा अंतिम प्रस्ताव कॅबिनेट समोर लवकरच आणला जाईल. तसेच पुरंदर आयटी पार्कची मी आजच घोषणा करीत असल्याचे सांगितले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वी महसूल विभागाच्या जमिनीवर अशा पद्धतीने उद्योग उभारणीचे काम केलेले आहे. त्यांच्याशी चर्चा करून महसूल विभागाची जागा हस्तांतरण प्रक्रिया वेगवान करण्याबाबत सरकार हालचाली करेल असेही सामंत म्हणाले.

आयटी पार्कवर शिक्कामोर्तब – शिवतारे

दरम्यान या घोषणेनंतर आमदार विजय शिवतारे यांनी आनंद व्यक्त केला. पुरंदर तालुक्यात आयटी पार्कवर आता शिक्कामोर्तब झाले असून लवकरात लवकर हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी मी पुढील काळातही पाठपुराव्यात सातत्य ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

प्रस्तावित गाव व क्षेत्रफळ पुढील प्रमाणे –

चांबळी – १८५.६८ हेक्टर
दिवे – १८८.८३ हेक्टर
कोडीत बु – १२४.१ हेक्टर
कोडीत खु – ७३.९३ हेक्टर
एकूण* – ५७२.५४ हेक्टर (१४८४ एकर).

 

Web Title: Purandar it park the purandar it park is set to be established on 1500 acres of land in purandar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Purandar News
  • Uday Samant
  • vijay shivtare

संबंधित बातम्या

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण
1

Ratnagiri :रत्नागिरीत पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचे लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.