Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहिल्यानगरमध्ये रब्बीच्या पेरणीला उशीर! जिल्ह्यात ज्वारीची सर्वाधिक पेरणी

यंदा नगर जिल्ह्यात पेरणीला चांगलाच उशीर झाला आहे. त्यात सर्वाधिक 18 टक्के पेरणी ज्वारीची करण्यात आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 07, 2025 | 08:10 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

सुनील गर्जे/ नवराष्ट्र: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदाच्या रब्बी पेरणीला उशिर होत आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागांत शेतीत पाणी साठले असून पेरणीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १० टक्के रब्बी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यामध्ये ज्वारीची सर्वाधिक १८ टक्के पेरणी झाली असली तरी तीही नेहमीच्या तुलनेत कमीच आहे.

नेवासे, शेवगाव, पाथर्डी, राहुरी, राहाता आणि अकोले या तालुक्यांमध्ये पेरणीचे प्रमाण विशेषतः कमी आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात सरासरी ४,४३,३४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. यापैकी सर्वाधिक क्षेत्र ज्वारीखाली राहतं, तर त्यापाठोपाठ हरभरा आणि गहू ही प्रमुख पिके घेतली जातात.

अतिवृष्टी आणि पुराचा फटका

यंदा अतिवृष्टी आणि पुराने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले. सतत महिनाभर सुरू असलेल्या पावसामुळे अजूनही काही शेतीभागात पाणी साठून आहे. त्यामुळे वापसा न मिळाल्याने रब्बी पेरणी लांबणीवर गेली आहे.

Kolhapur News : स्थानिक आघाडी नाही, प्रसंगी तुतारीच्या चिन्हावर लढू ; मोहोळ गावात निवडणुकीची रणधुमाळी

गहू आणि हरभऱ्याची पेरणी सुरू – कृषी विभाग

अहिल्यानगर जिल्ह्यात पाण्याची स्थिती चांगली असली तरी कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकांकडून मोठी अपेक्षा आहे. रब्बीमध्ये प्रामुख्याने हरभरा, गहू आणि मकाचे क्षेत्र अधिक असते.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गहू आणि हरभऱ्याची पेरणी सुरू झाली असून पुढील महिनाभरात त्याला मोठ्या प्रमाणात वेग येईल. गव्हाची पेरणी साधारणपणे डिसेंबरअखेरपर्यंत केली जाते.

आतापर्यंत ४४ हजार हेक्टरवर पेरणी

जिल्ह्यात आत्तापर्यंत ४४ हजार हेक्टरवर, म्हणजे १० टक्के पेरणी झाली आहे. पिकनिहाय पाहता ज्वारीची ३२ हजार हेक्टर म्हणजे १८ टक्के पेरणी झाली आहे.

Satara News: महावितरण विरोधात वाईत शेतकरी आक्रमक: सौर ऊर्जा धोरणाने नदीकाठच्या शेतकऱ्यांपुढे पेच

तालुका-निहाय स्थिती:

  • अहिल्यानगर – 42%
  • पारनेर – 17%
  • श्रीगोंदे – 17%
  • कर्जत – 4%
  • जामखेड – 8%
  • संगमनेर – 3%
  • श्रीरामपूर – 2%

गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने शेतजमिनी कोरड्या होत असून, रब्बी पेरणी आता वेग घेईल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 1. अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी पेरणीला उशिर का झाला आहे?

    Ans: अतिवृष्टी आणि पुराने अनेक भागांत पाणी साचले असून पेरणीला विलंब झाला आहे.

  • Que: यंदा कोणत्या पिकांची पेरणी सर्वाधिक झाली आहे?

    Ans: सध्याच्या घडीला ज्वारीची सर्वाधिक 18% पेरणी झाली आहे.

  • Que: गहू आणि हरभऱ्याची पेरणी कधीपर्यंत सुरू राहते?

    Ans: गहू आणि हरभऱ्याची पेरणी नोव्हेंबर ते डिसेंबरअखेरपर्यंत सुरू राहते, आणि यंदाही पुढील महिनाभरात मोठ्या प्रमाणात पेरणी होईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

Web Title: Rabi sowing delayed in ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 08:10 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • maharashtra news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध
1

Mumbai : सीएसएमटी येथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रवासी संघटनांचा निषेध

Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप
2

Ratnagiri : रत्नागिरीत डांबर घोटाळा; शिवसेना उपनेते बाळ माने यांचा आरोप

पाथर्डी तालुक्यात एकाच दिवसात 4 आत्महत्या! परिसरात भीतीचे वातावरण, नेमकं घडलं काय?
3

पाथर्डी तालुक्यात एकाच दिवसात 4 आत्महत्या! परिसरात भीतीचे वातावरण, नेमकं घडलं काय?

Kolhapur News : स्थानिक आघाडी नाही, प्रसंगी तुतारीच्या चिन्हावर लढू ; मोहोळ गावात निवडणुकीची रणधुमाळी
4

Kolhapur News : स्थानिक आघाडी नाही, प्रसंगी तुतारीच्या चिन्हावर लढू ; मोहोळ गावात निवडणुकीची रणधुमाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.