Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेवस पाणीपुरवठा विभागाने गणेशोत्सवाच्या वेळी रस्ता खोदून केला बंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, दुरुस्ती करण्याची केली मागणी

सदर कनकेश्वर फाटा येथील रवि शास्त्री चौकातील रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी करत नागरिकांची व वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर करावी, अन्यथा दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 26, 2023 | 06:24 PM
रेवस पाणीपुरवठा विभागाने गणेशोत्सवाच्या वेळी रस्ता खोदून केला बंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, दुरुस्ती करण्याची केली मागणी
Follow Us
Follow Us:

रायगड : उद्धव ठाकरे सरकारमध्ये असलेले त्यावेळचे तत्कालीन बांधकाम मंत्री व आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस मार्गावरील कनकेश्वर फाटा येथे कार्लेखिंडकडे जाणाऱ्या चौकाचे रवी शास्त्री चौक सुशोभिकरण म्हणून मोठ्या थाटात उद्घाटन केले होते. परंतु या चौकाचा पाणीपुरवठा विभाग, महावितरण विभाग, बांधकाम विभाग हे अनेक कारणांनी याठिकाणी वारंवार खोदकाम करून चौकाचे विद्रुपीकरण होत असल्याने संतप्त प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते व किहीम ग्रामपंचायत सदस्य प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी सांगितले. तसेच सदर कनकेश्वर फाटा येथील रवि शास्त्री चौकातील रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी करत नागरिकांची व वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर करावी, अन्यथा दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेशोत्सवाच्या तोंडावर रेवस पाणीपुरवठा विभागाने अलिबाग रेवस मार्गावरील कनकेश्वर फाटा येथील कार्लेखिंड बाजूकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत पाण्याची जलवाहिनी फुटल्याने भररस्त्यात खोदकाम करून मागील काही दिवसांपासून तो खड्डा तसाच ठेवला आहे, यामुळे अलिबाग रेवस मार्ग व कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड मार्ग या दोन्ही मार्गावर ऐन गणेशोत्सवाच्या काळात प्रवास करणाऱ्या नागरिकांना व लहानमोठ्या वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, तसेच कार्लेखिंड बाजूकडे जाणारा एक मार्ग बंद असल्याने व याठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने दोन्ही मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे मिटून हे सर्व पाहत असल्याचे पिंट्या गायकवाड यांनी संतप्त होत सांगितले, तसेच संबंधित प्रशासनाने याची गंभीरपणे दखल घेऊन सदर कनकेश्वर फाटा येथील रवि शास्त्री चौकातील पेण कडे जाणारा रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती व पूर्ववत सुशोभिकरण करून नागरिकांना व याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना तसेच वाहनचालकांना दिलासा द्यावा, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते व किहीम ग्रामपंचायत सदस्य प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांनी दिला आहे. याकडे संबंधित प्रशासन काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Raigad maharashtra political party eknath shinde ravindra chavan ravi shastri kankeshwar phata alibaug revus road pintya gaikwad rasta roko movement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2023 | 06:24 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Maharashtra Government
  • Ravi Shastri
  • Ravindra Chavan
  • Social Worker

संबंधित बातम्या

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?
1

Engineering Admission 2026 : इंजिनिअरिंग प्रवेशाची चौथी फेरी जाहीर! या फेरीत किती विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार?

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार
2

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
3

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?
4

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.