Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: १५८ कोटींच्या भुयारी गटार योजनेवरून माणगाव नगरपंचायतीत खडाजंगी! सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, नेमकं काय घडलं?

गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी नगरपंचायत कार्यालय सभागृहात सभेच्या पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी विशेष सभा बोलाविली होती. जागतिक बँक सहाय्यित माणगाव नगरपंचायतीसाठी एमयुडब्लूआरइपी अंतर्गत भुयारी गटार योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सभा आयोजित केली होती.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 31, 2026 | 01:48 PM
Raigad News: १५८ कोटींच्या भुयारी गटार योजनेवरून माणगाव नगरपंचायतीत खडाजंगी! सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, नेमकं काय घडलं?

Raigad News: १५८ कोटींच्या भुयारी गटार योजनेवरून माणगाव नगरपंचायतीत खडाजंगी! सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • नगरपंचायतीची भुयारी गटार योजना राबविणेबाबतची विशेष सभा मात्र वादळी ठरली
  • माणगाव नगरपंचायत हद्दीत भुयारी गटार योजना राबविण्यासाठी १५८ कोटी रुपये निधी मंजूर झाला
माणगाव: जागतिक बँक सहाय्यित माणगाव नगरपंचायतीसाठी एमयुडब्लूआरइपी अंतर्गत भुयारी गटार योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यासाठी नगरपंचायतीच्या नगरसेवक, नगरसेवकांची विशेष सभा गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी नगरपंचायत कार्यालय सभागृहात सभेच्या पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी बोलाविली होती. माणगाव नगरपंचायतीची भुयारी गटार योजना राबविणेबाबतची ही विशेष सभा मात्र वादळी ठरली. या सभेत नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी या योजनेच्या ठरावाबाबत बोलताना, ही योजना ज्या नगरसेवकांना मंजूर आहे त्यांनी बोट वर करावे, असे सूचित केल्यावर १० विरुद्ध ६ मतांनी ही योजना मंजूर करण्यात आली. तर यावेळी उपस्थित विरोधी गटाच्या नगरसेवक, नगरसेविकांनी ही सभा नियमबाह्य असल्याचा आक्षेप घेत याबाबतीत आम्ही रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.

Women: स्त्रीशक्तीचा संघर्ष आणि अस्तित्वाची कहाणी!! महिलांच्या जीवनातील विविध पैलू आणि हक्कांचे दर्शन घडविणारे छायाचित्र प्रदर्शन

या सभेला नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे, उपनगराध्यक्ष रिया उभारे, नगरसेवक आनंद यादव, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पवार, पाणीपुरवठा सभापती अजित तारलेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती नंदिनी बामगुडे, नगरसेवक कपिल गायकवाड, नगरसेवक दिनेश रातवडकर, नगरसेवक राजेश मेहता, नगरसेवक सचिन बोंबले, नगरसेवक प्रशांत साबळे, नगरसेविका ममता थोरे, नगरसेविका रश्मी मुंढे, नगरसेविका सुशीला वाढवळ, नगरसेविका लक्ष्मी जाधव, नगरसेविका सुविधा खैरे, नगरसेविका हर्षदा सोंडकर, स्वीकृत नगरसेवक विश्वजित जाधव, स्वीकृत नगरसेवक विठोबा पालकर, मुख्याधिकारी संतोष माळी आदी उपस्थित होते. (फोटो सौजन्य – AI Created) 

जागतिक बँक सहाय्यित माणगाव नगरपंचायत हद्दीत भुयारी गटार योजना राबविण्यासाठी १५८ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. ही योजना माणगाव नगरपंचायत हद्दीत सर्वत्र राबविण्यासाठी नगरपंचायतीचा बहुमताने ठराव घेणे आवश्यक होता. त्यासाठी गेल्या २७ ऑगस्ट रोजी भुयारी गटार योजना राबविण्यासाठी नगरपंचायतीच्या नगरसेवक, नगरसेवकांची पहिली सभा बोलाविण्यात आली होती.

योजना पाहिजे; विकासाला विरोध नाही

आपल्याला लोकांनी निवडून दिले असल्याने विकासकामांना आपण कधी विरोध करणार नाही, ही योजना आपल्याला नगरपंचायतीत राबवायची असल्याचे सभेच्या पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे यांनी सांगितले, यावर आक्षेप घेत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद यादव म्हणाले, की आमचा विकासकामांना कोणताही विरोध नाही.

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

भुयारी गटार योजना झाली पाहिजे या मताचे आम्ही देखील आहोत. परंतु ही योजना राबविण्यासाठी ऑगस्ट महिन्यात झालेल्या नगरपंचायतीच्या सभेत सर्वानुमते रद्द करण्यात आली होती. त्यानंतर असे काय घडले की पुन्हा २ महिन्यांनी ही सभा घ्यायला लागली?, ही सभा नियमबाह्य व अवैध आहे. या योजनेसाठी सुरुवातीला ५ टक्के रक्कम म्हणजेच जवळपास ७ कोटी रुपये नगरपंचायतीला भरायचे आहेत. या योजनेमुळे नगरीतील ग्रामस्थांवर कर बसणार आहे. सध्या नगरपंचायतीची आर्थिक अवस्था बिकट आहे. लाईटबील, कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी नगरपंचायतीकडे पैसे नाहीत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: 158 crore rupees underground sewage project approved in mangaon resolution passed 10 6 amid controversy hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Beed drought situation: गोदावरी आटली! दशक्रिया विधीसाठी नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ!
1

Beed drought situation: गोदावरी आटली! दशक्रिया विधीसाठी नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ!

Chandrapur News: चंद्रपुरात दुष्काळाचे संकट, आता जनावरांच्या चाऱ्याची चिंता! जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश
2

Chandrapur News: चंद्रपुरात दुष्काळाचे संकट, आता जनावरांच्या चाऱ्याची चिंता! जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
3

सहा महिने शिकवूनही पगार नाही! मिरा-भाईंदरमधील ४० शिक्षकांची आर्थिक कोंडी, महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Civil Court Recruitment 2026: १० वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; सिव्हिल कोर्टात ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू!
4

Civil Court Recruitment 2026: १० वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; सिव्हिल कोर्टात ‘या’ पदांसाठी अर्ज सुरू!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.