Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील नालेसफाईच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो रुपयांचा खर्च झाल्याचा दावा असतानाही नाले तुंबल्याने केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर साचत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 06, 2026 | 11:22 AM
Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली

Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली

Follow Us
Follow Us:
  • धाटाव MIDC मध्ये नालेसफाईवर लाखो रुपये खर्च झाल्याचा दावा असला तरी अनेक नाले अद्याप तुंबलेल्या अवस्थेत आहेत.
  • केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर साचल्याने कामगार, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
  • दोषींवर कारवाई न झाल्यास MIDC कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
रोहा: धाटाव औद्योगिक वसाहतीत पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामावर लाखो रुपयांचा खर्च झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाले तुंबलेलेच असल्याचे चित्र समोर आले आहे. नाल्यांमधील गाळ, कचरा आणि रासायनिक अवशेष न काढल्याने पावसाचे पाणी तसेच केमिकलयुक्त सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अन्यथा एमआयडीसी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपने दिला आहे. रोहाडाय, प्रिव्ही, निलिकॉन, मजदा, आयन एक्सचेंज, अंशुल, साप्रट्रानस, बेक केमिकल्स आदी अनेक उद्योगांच्या परिसरातील नाल्यांमध्ये पावसाचे व रासायनिक पाणी तुंबले असून अनेक चेंबर ओव्हरफ्लो झाले आहेत.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा हाहाकार! सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात; लोकल ट्रेनची वाहतूक उशिराने, रेड अलर्ट जारी

परिणामी हिरव्या रंगाचे केमिकलयुक्त पाणी थेट रस्त्यावर वाहत असून परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे हजारो कामगार, शाळकरी विद्यार्थी, महिला, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना रोज जीव मुठीत धरून या केमिकलयुक्त पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनाही कार्यालयात जाण्यासाठी या दूषित पाण्यातून चालत जावे लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

केमिकलयुक्त पाण्यातून मार्ग काढण्याची आली वेळ

औद्योगिक वसाहतीतील नालेसफाईच्या कामावर लाखो रुपये खर्च होत असताना प्रत्यक्षात नागरिकांना केमिकलयुक्त पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने एमआयडीसी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे.

धाटाव एमआयडीसी प्रशासनाची भूमिका

या संदर्भात एमआयडीसीचे उपअभियंता निशिकांत गीतेंशी संपर्क साधला असता सांगितले, “यावर्षी नालेसफाईची कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी गटारांची कामे सुरू असल्याने किंवा काही भागात किरकोळ कामे बाकी असू शकतात. अशा ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती नालेसफाई व दुरुस्तीची कार्यवाही करण्यात येईल.”

अधिकाऱ्यांनीही दिली कबुली

अनेक उद्योगांच्या अधिकाऱ्याऱ्यांनीही यंदाची नालेसफाई समाधानकारक न झाल्याची कबुली दिली आहे. काही ठिकाणी नाल्यातील गाळ बाहेर काढून तो नाल्याच्या कडेलाच टाकण्यात आला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे तोच गाळ पुन्हा नाल्यात वाहून गेल्याने संपूर्ण नालेसफाई केवळ कागदोपत्रीच झाल्याचा आरोप होत आहे.

Rain Updates: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; कुठे दरड कोसळली, कुठे पाणी साचलं? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व अपडेट्स

या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी केली असून संबंधित ठेकेदाराचे बिल चौकशी पूर्ण होईपर्यंत अदा करू नये, अशी मागणी आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास भाजपचे रोहा तालुकाध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसी कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल. – सचिन मोरे, धाटाव विभाग अध्यक्ष, भाजप

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Alleged poor drain cleaning in dhataw midc triggers chemical waterlogging bjp warns of protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • Raigad News

संबंधित बातम्या

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
1

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
2

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!
3

Satara News: :दुष्काळाच्या कचाट्यात शेतकरी; दूध व्यवसायानेही सोडली साथ!

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी
4

Wai News : बिबट्याच्या वाढत्या वावराने पश्चिम वाईत भीती; पिंजरे-कॅमेरे बसवण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.