
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरण! भोंदूगिरीतून कमावलेल्या मालमत्तांचे धागेदोरे पनवेलपर्यंत; नातलगांच्या नावावर कोट्यवधींची जमीन
Ashok Kharat Case: भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोप असलेला कॅप्टन अशोक खरात आता एका नवीन वादामुळे चर्चेत आला आहे. खरात याच्या मालमत्तेचे धागेदोरे नवी मुंबई आणि पनवेल परिसरापर्यंत पोहोचल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पनवेलमधील शिरढोन गावामध्ये खरात याच्या नातेवाईकांच्या नावावर मोठ्या जमिनीची नोंद झाल्याचे उघड झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरढोन गावातील गट क्रमांक ५६/२ मध्ये खरात यांच्या नातेवाईकांच्या नावे सुमारे ५१ गुंठे जमिनीचा सातबारा उतारा आहे.
हे क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अतिशय जवळ असल्याने या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. मिडीयाच्या माध्यमातून हा व्यवहार समोर आल्यानंतर स्थानिक रहिवासी रोशन महादेव पवार आणि इतरांनी या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरलेला पैसा भोंदूगिरीतून मिळवला आहे का, याची तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
५१ गुंठे जमिनीचा व्यवहार
सध्या या परिसरात जमिनीचा दर साधारणतः १० ते १२ लाख रुपये प्रति गुंठा इतका आहे. या हिशोबाने या ५१ गुंठे जमिनीची किंमत आजच्या घडीला ५ ते ६ कोटी रुपयांच्या घरात जाते. इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करण्यासाठी पैसे कोठून आले, असा प्रश्न आता स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
महसूल विभागावर आरोपांचे सावट
जमिनीची नोंदणी अत्यंत घाईघाईने पूर्ण करण्यासाठी महसूलच्या अधिकाऱ्यांनी विशेष मदत केल्याचा खळबळजनक आरोपही केला जात आहे. विमानतळ परिसरातील वाढत्या नागरीकरणामुळे जमिनीचे भाव वाढत असताना, खरातने ही गुंतवणूक जाणीवपूर्वक केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
पेणच्या बोरगाव येथील एका रिसॉर्टमध्ये सुरू बेकायदेशीर वेश्या व्यवसायाचा पेण पोलिसांनी पर्दाफाश केला. चार आरोपींना अटक केली असून तीन पीडित महिलांची सुटका केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना खबऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सेलिब्रेशन रिसॉर्टमध्ये धाड टाकली. सोमवारी रात्री ८. ४० मिनिटांच्या सुमारास दोन बनावट ग्राहकांना रिसॉर्टमध्ये पाठवून बनावट ग्राहकांच्या माध्यमातून खात्री झाल्यानंतर छापा टाकत प्रकार उघड केला. झुल्फीकार उद्दीन (३०, पनवेल), खगेंद्र मलीक (४३), देवेंद्र पाटील (३६, पेण), रविंद्र मलीक (३२, अलिबाग) या चौघांना अटक केली. आरोपींनी संगनमताने तीन महिलांना आणून आर्थिक फायद्यासाठी रिसॉर्टमध्ये वेश्या व्यवसाय चालवल्याचे निष्पन्न झाले आहे.