Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : वर्षातून तीनदा परदेशात जाऊन पूजा केल्यास भरभराट; खरात मारायचा मोठमोठ्या थापा

आत्तापर्यंत खरातवर ७ बलात्काराचे गुन्हे दाखल असताना, आर्थिक फसवणुकीसह खंडणीचा हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, खरातने परदेशात मौजमजेसाठी भक्तांच्या खिशांवर डल्ला मारला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2026 | 11:15 AM
Ashok Kharat Case : वर्षातून तीनदा परदेशात जाऊन पूजा केल्यास भरभराट; खरात मारायचा मोठमोठ्या थापा

Ashok Kharat Case : वर्षातून तीनदा परदेशात जाऊन पूजा केल्यास भरभराट; खरात मारायचा मोठमोठ्या थापा

Follow Us
Follow Us:

नाशिक : नाशिकच्या वादग्रस्त ‘कॅप्टन’ अशोक खरात ऊर्फ ‘कॅप्टन बाबा’ याच्या पापाचा घडा आता आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांनी भरू लागला आहे. 31 डिसेंबरला परदेशात विशेष पूजा केल्यास ‘विशेष लाभ’ मिळतो. तसेच वर्षातून तीनवेळा अशी पूजा केल्यास भरभराट होईल, अशी अपेक्षा दाखवत एका सधन भक्ताला लाखो रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

धक्कादायक म्हणजे, आत्तापर्यंत खरातवर ७ बलात्काराचे गुन्हे दाखल असताना, आर्थिक फसवणुकीसह खंडणीचा हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, खरातने परदेशात मौजमजेसाठी भक्तांच्या खिशांवर डल्ला मारला. आपले कल्याण होईल, या आशेवर फिर्यादीच्या खिशाला सोयीस्कर खिंडार पाडले. ३१ डिसेंबरला परदेशात केलेली पूजा अत्यंत फलद्रूप ठरते, असे सांगून त्याने अनेक भाकडकथा भक्ताला ऐकवल्या. अंधश्रद्धेपोटी फिर्यादीला खरातचा अंतस्थ हेतू लक्षात आला नाही.

खरात प्रकरणातील संवेदनशीलता लक्षात घेऊन राज्य सरकारने स्थापन केलेले विशेष तपास पथक अत्यंत गोपनीय आणि प्रभावी पद्धतीने कार्य करत आहे. या पथकाचे नेतृत्व तेजस्विनी सातपुते करत असून, त्यांच्यासोबत महिला पोलीस निरीक्षक तृप्ती देसाई व इतर अधिकारी महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेत आहेत. पीडित महिलांची ओळख उघड होऊ नये, याची पूर्णतः खबरदारी घेतली जाते. तपासासाठी किंवा घटनास्थळाच्या पाहणीसाठी नेताना महिलांची गोपनीयता जपण्यावर पथकाचा भर आहे.

दबावापोटी महिला पुढे नाही

अनेकदा सामाजिक दबावापोटी पीडित महिला पुढे येत नाहीत. अशा वेळी केवळ महिलेचेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांचेही समुपदेशन करून त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. तपासाच्या प्रक्रियेत पीडितांना कोणत्याही दडपणाखाली वाटू नये, यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशीलतेने पावले उचलत आहे.

दरम्यान, खरात प्रकरणातील काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर सहजतेने अपलोड केले जात आहेत. यामुळे महिलेसह तिच्या कुटुंबियांची बदनामी होते. हे प्रकार थांबवण्याचे आवाहन विशेष तपास पथकाने केले होते. मात्र, तरीही वेगवेगळ्या समाज माध्यमांवर व्हिडीओ अपलोड केले जात आहेत. एका प्रकरणात एसआयटीने आहिल्यानगरमधील एकाविरोधात नोटीस बजावून सुद्धा त्याने दुर्लक्ष केले. त्या व्यक्तीविरोधात बुधवारी (दि.२५) रात्री गुन्हा दाखल होण्याचे संकेत संबंधित पोलिस अधिकाऱ्याने दिले.

खंडणीचा पहिलाच गुन्हा

अशोक खरातवर आतापर्यंत नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यांत ७ बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, परदेशातील पूजेच्या आमिषाने केलेली ही आर्थिक लूट पाहता, खरातने केवळ शारीरिकच नव्हे, तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक साम्राज्यही उभे केल्याचे स्पष्ट होत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांच्या मालिकेव्यतिरिक्त हा पहिलाच आर्थिक फसवणुकीचा गुन्हा ठरल्याने पोलिसांच्या तपासाची दिशा आता खरातच्या बँक खात्यांकडे आणि परदेश वाऱ्यांकडे वळली आहे.

उशिरापर्यंत गुन्हा दाखल

अशोक खरातची वरिष्ठ राजकीय नेत्यांमधील उठबस पाहून भक्ताचा त्याच्यावर विश्वास बसला होता. वर्षातून तीन वेळा आणि सलग पाच वर्षे ही पूजा केल्यास अमाप श्रीमंती मिळेल, अशी फेकाफेक खरातने केली होती. मात्र, खरातचा खरा चेहरा समोर आल्यानंतर फिर्यादीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्याची नोंद झाली.

Onion Growers : कांदा उत्पादकांसाठी सरकारकडून ठोस उपाययोजना; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वपू्र्ण निर्देश

Web Title: Worshiping abroad three times a year brings prosperity says ashok kharat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.