Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अशोक खरात यांचे शिर्डी-राहता कनेक्शन; तब्बल 2000 कोटींच्या संपत्तीचा अंदाज

राज्यभरात अशोक खरात प्रकरण गाजत आहे. विशेष म्हणजे या भोंदू बाबाचे पाळेमुळे शिर्डी आणि राहाता तालुक्यात घट्ट रोवलेली असल्याचे समोर आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 25, 2026 | 08:52 PM
अशोक खरात यांचे शिर्डी-राहता कनेक्शन; तब्बल 2000 कोटींच्या संपत्तीचा अंदाज

अशोक खरात यांचे शिर्डी-राहता कनेक्शन; तब्बल 2000 कोटींच्या संपत्तीचा अंदाज

Follow Us
Follow Us:
  • अशोक खरातचा शिर्डी आणि राहाताशी कनेक्शन
  • वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक व्यवहार केल्याचे समोर
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत आहे. श्रद्धा, अध्यात्म आणि चमत्काराच्या आड उभ्या राहिलेल्या या साम्राज्याचा काळा चेहरा आता उघड होत असून, या प्रकरणाचे पडसाद राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात तीव्रतेने उमटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शिर्डी येथे असलेल्या मालमत्तेबाबत आणि झालेल्या बैठकांबाबत जिल्ह्यात मोठी उत्सुकता आहे.

या भोंदूबाबाच्या जाळ्यांची मूळ शिर्डी आणि राहाता तालुक्यात घट्ट रोवलेली असल्याचे समोर येत आहे. विशेषतः शिडीं, साकुरी आणि काकडी विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिन खरेदी, आलिशान हॉटेल्स, तसेच कोट्यवधींचे आर्थिक व्यवहार उभे करून एक प्रचंड साम्राज्य उभारल्याचे उघड होत आहे. श्रद्धेच्या नावाखाली उभारलेले हे आर्थिक जाळे आता संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

Ahilyanagar News: ‘ती’ एक चूक आणि संगमनेर पोलीस ठाण्यात शेकडो महिलांचे ठिय्या आंदोलन

दोन हजार कोटींच्या संपत्तीचा अंदाज…

मिळालेल्या माहितीनुसार, बाबाच्या नावावर तब्बल दोन हजार कोटींपेक्षा अधिक चल-अचल संपत्ती असल्याचा अंदाज आहे. विविध शहरांमध्ये जमीन, फ्लॅट्स, हॉटेल्स आणि गुंतवणुकीचे जाळे उभे आहे.

या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली ती ५ मार्च रोजी जेव्हा कॅप्टन बाबाच्या एका निकटवर्तीय कर्मचाऱ्याने अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे एक पेनड्राईव्ह सुपूर्द केला. या पेनड्राईव्हमधील माहितीने तपास यंत्रणेला हादरवून सोडले.

घार्गे यांनी तातडीने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत माहिती देत प्रकरणाचे गांभिर्य अधोरेखित केले. फडणवीस यांनी संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर तपासाला वेग आला. डिसेंबर 2024 पासूनच या प्रकरणाची बीजे रोवली गेली होती.

Onion Growers : कांदा उत्पादकांसाठी सरकारकडून ठोस उपाययोजना; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले ‘हे’ महत्त्वपू्र्ण निर्देश

संबंधित कर्मचाऱ्याने गुप्त कॅमेऱ्याच्या साहाय्याने जवळपास दीड महिन्याच्या कालावधीत अनेक धक्कादायक व्हिडिओ रेकॉर्ड केले. या व्हिडिओमध्ये महिलांशी गैरवर्तन, अंधश्रद्धेच्या नावाखालील अमानवी कृत्ये आणि विकृत प्रकार दिसत असल्याचा दावा केला जात आहे.

पोलिस अधिकारीमार्फत कर्मचाऱ्यास मारहाण

संतापजनक बाब म्हणजे प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये घृणास्पद प्रकारांचा समावेश असल्याचे आरोप आहेत. श्रद्धाळूच्या भावनांचा गैरफायदा घेत मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचे समोर येत आहे. घृणास्पद प्रकार उघडकीस आणणाऱ्या त्यांच्याच एका कर्मचाऱ्याला एका पोलिस अधिकाऱ्यामार्फत बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याचा आरोप आहे.

अटक झाली पण अनेक प्रश्न अनुत्तरीत

अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहे? नेमके किती मोठे जाळे आहे? कोणकोण यात सामील आहे ? सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पीडितांना न्याय मिळणार का? ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित नसून अंधश्रद्धा, भीती आणि आंधळ्या भक्तीच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या व्यवस्थेचा भयानक चेहरा उघड करते.

आता व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा मुद्दा

शिर्डी येथे दाखल तक्रारीनंतर तपासाने वेग घेतला. पोलिसांनी तपासाची दिशा बदलत मूळ प्रकरणाचा सखोल छडा लावला. शिर्डी-राहाता परिसरात खोलवर पसरलेले हे आर्थिक आणि सामाजिक जाळे आता उखडून काढणे हीच खरी कसोटी ठरणार आहे. आता निष्पक्ष, कठोर आणि पारदर्शक तपासाची गरज आहे. एका ‘बाबा’चा नाही तर संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचा हा मुद्दा आहे.

Web Title: Ahilyanagar news ashok kharat financial connection with shirdi and rahta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Ashok Kharat
  • shirdi

संबंधित बातम्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
1

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Ahilyanagar मध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार! अनिल भय्या राठोडांच्या कार्यालयाला भेट देत अर्जुन खोतकरांचा मोठा दावा
2

Ahilyanagar मध्ये पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार! अनिल भय्या राठोडांच्या कार्यालयाला भेट देत अर्जुन खोतकरांचा मोठा दावा

Ahilyanagar news: अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; आईच्या नावाने लावली ७० झाडे
3

Ahilyanagar news: अहिल्यानगरच्या कर्जतमध्ये पर्यावरणपूरक उपक्रम; आईच्या नावाने लावली ७० झाडे

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!
4

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.