Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case: “जादूटोण्याने निवडणुका जिंकता आल्या असत्या तर…”, अशोक खरात प्रकरणी मुख्यमत्र्यांनी सभागृहात स्पष्टच सांगितल

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणावरून जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, "जर जादूटोणा करून समस्या सुटल्या असत्या, तर खरातला आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून नेमले असते.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 25, 2026 | 06:21 PM
अशोक खरात प्रकरणी मुख्यमत्र्यांनी सभागृहात स्पष्टच सांगितल (Photo Credit- X)

अशोक खरात प्रकरणी मुख्यमत्र्यांनी सभागृहात स्पष्टच सांगितल (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • “जादूटोण्याने निवडणुका जिंकता आल्या असत्या तर…”
  • अशोक खरात प्रकरणी मुख्यमत्र्यांनी सभागृहात स्पष्टच सांगितल
  • नेमकं काय म्हणाले…
CM Devendra Fadnavis on Ashok Kharat: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या कर्तृत्वाचे एकामागून एक ‘कांड’ बाहेर येत असतानाच, आता राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. “श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील रेषा पुसट झाल्यावर विवेक कसा हरवतो, हे या प्रकरणातून दिसून येते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत संताप व्यक्त केला. खरातवर आतापर्यंत सात गुन्हे दाखल झाले असून, या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढली जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

“जादूटोण्याने निवडणुका जिंकता आल्या असत्या तर…”

अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणावरून जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले, “जर जादूटोणा करून समस्या सुटल्या असत्या, तर खरातला आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांचा सल्लागार म्हणून नेमले असते. इतकेच कशाला, निवडणुकांसाठी प्रचारसभा घेण्याचीही गरज उरली नसती; एका जागी बसूनच निवडणुका जिंकता आल्या असत्या.” या उपरोधिक विधानातून त्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाणाऱ्या मानसिकतेवर प्रहार केला.

LIVE | अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला विधानसभेत उत्तर 🕟 संध्या. ४.४० वा. | २५-३-२०२६📍विधान भवन, मुंबई.#Maharashtra #Mumbai #MahaBudget2026 https://t.co/gVqDuRrDbZ — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 25, 2026

Ashok Kharat : “फडणवीसांना CM पदावरुन काढून टाकण्यासाठी अघोरी पूजा? जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक दावा

जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम अंतिम टप्प्यात 

महाराष्ट्राला संतांची आणि थोर समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. संतांनी नेहमीच अंधश्रद्धेवर प्रहार केला आहे, याची आठवण करून देत फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र धर्म वाढलाच पाहिजे, पण भोंदूगिरीला येथे थारा मिळणार नाही.” जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेले नियम आता अंतिम टप्प्यात असून लवकरच ते लागू केले जातील, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

पाळेमुळे खोदून काढणार; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अजूनही अनेक ‘सूरस कथा’ आणि धक्कादायक माहिती समोर येणे बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनी जनतेला आणि लोकप्रतिनिधींना आवाहन केले की, “ज्यांच्याकडे या संदर्भात काहीही माहिती असेल, त्यांनी ती तातडीने शासनाकडे द्यावी. या व्यक्तीला अशी शिक्षा करायची आहे की, ज्यामुळे इतरांनाही जरब बसली पाहिजे.”

अशोक खरात याची पोलीस कोठडी 29 मार्चपर्यंत

भोंदूबाबा अशोक खरात याची पोलीस कोठडी 29 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच सात गुन्हे आतापर्यंत त्याच्यावर दाखल करण्यात आले. त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तसेच याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राज्यातील सनदी अधिकारी आणि बड्या नेत्यांसोबत त्याचे घरचे संबंध होते. पोलिसांच्या हाती लैंगिक अत्याचार करतानाचे 100 पेक्षा अधिक व्हिडीओ आहेत. तसेच त्याचे राजकीय नेत्यांसोबत वैयक्तिक संबंध असल्याचे समोर आले आहे.

अशोक खरातचा नवीन कारनामा पीडित महिलेला धमकी देऊन केले अत्याचार – तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले, माझ्याशी विवाह कर !

Web Title: The chief minister stated clearly in the house regarding the ashok kharat case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Ashok Kharat Case
  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.