Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: अलीबाग शहरातील महामार्गाची दुरावस्था, वाहनचालकांचा खड्ड्यांतूनच प्रवास सुरु! नागरिकांनी व्यक्त केला संताप

अलिबाग तालुक्यातील कुरुळ बायपास ते बेलकडे जाणाऱ्या महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 26, 2025 | 12:51 PM
Raigad News: अलीबाग शहरातील महामार्गाची दुरावस्था, वाहनचालकांचा खड्ड्यांतूनच प्रवास सुरु! नागरिकांनी व्यक्त केला संताप

Raigad News: अलीबाग शहरातील महामार्गाची दुरावस्था, वाहनचालकांचा खड्ड्यांतूनच प्रवास सुरु! नागरिकांनी व्यक्त केला संताप

Follow Us
Close
Follow Us:
  • खड्ड्यांतूनच सुरू आहे वाहनचालकांचा प्रवास
  • वाहनचालक हैराण, प्रशासनावर टीका
  • अलीबाग शहरातील महामार्गावर खड्ड्यांचा सुळसुळाट
अलिबाग तालुक्यातील कुरुळ बायपास ते बेलकडे जाणारा राज्य महामार्ग सध्या अक्षरशः खड्डेमय झाला असून प्रवासी नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. राज्य महामार्ग असलेल्या या रस्त्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (एमएसआयडीसी) कोट्यवधी रुपयांची मोठी निविदा काढल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या मार्गावर काही ठिकाणी किरकोळ काम सुरू असल्याचे चित्र दिसते. मात्र, संपूर्ण रस्त्यावर पडलेले भयानक खड्डे बुजविण्याची किंवा तातडीची दुरुस्ती करण्याची साधी उपाययोजनाही संबंधित खात्याने केलेली नाही. त्यामुळे रोज शेकडो वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार, रिक्षाचालक, खासगी वाहने तसेच अवजड वाहनांसाठी हा रस्ता धोक्याचा ठरत आहे.

Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

अधिकाऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप

पावसाळ्यानंतर रस्त्यावरील खड्यांची तीव्रता अधिक वाढली असून काही ठिकाणी वाहनांचे नुकसान, अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. तरीही प्रवासी जनतेला थोडासा दिलासा देण्यासाठी तात्पुरती डागडुजी करण्याची तसदीही प्रशासन घेत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य महामार्ग असूनही संबंधित विभागातील अधिकाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील आता केला जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

लोकप्रतिनिधींबाबत अपेक्षाच सोडून दिल्या

जिल्हा प्रशासनानेही अद्याप या प्रकरणाकडे ठोस लक्ष दिलेले नाही. जिल्हाधिकारी स्तरावरून पाहणी किंवा तातडीचे आदेश निघत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. लोकप्रतिनिधींविषयी तर नागरिकांनी अपेक्षाच सोडून दिल्याची भावना व्यक्त होत असून, निवडणुकीच्या वेळी मतांची किंमत मोजून मतं विकत घेतली जातात. मात्र निवडणूक संपल्यानंतर जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे कोणीही फिरकत नाही, अशी टीका होत आहे.

प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

कुरुळ बायपास-बेलकडे हा मार्ग अलिबाग शहराला तसेच तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा महत्वाचा राज्य महामार्ग आहे. पर्यटन, वाहतूक व दैनंदिन प्रवासासाठी हा रस्ता अत्यंत आवश्यक असतानाही त्याची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

शासन निर्णय धाब्यावर? नवी मुंबईत नाताळच्या रात्री क्लब चालकांना पोलिसांकडून नाहक त्रास; आयुक्तांकडे दाद मागण्याची वेळ

नागरिकांच्या मागण्या

नागरिकांनी संबंधित यंत्रणेकडे मागणी केली आहे की, निविदा आणि कागदोपत्री कामापुरते न थांबता प्रत्यक्षात तातडीने खड्डे बुजविण्यात यावेत, रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी आणि तोपर्यंत तरी प्रवासी जनतेच्या सुरक्षिततेसाठी तात्पुरती उपाययोजना करावी. अन्यथा येत्या काळात या रस्त्यावर मोठे अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Bad condition of alibaug highway vehicles forced to drive through potholes raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • Alibaug
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
1

Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

मुंबईत टाळ्या शिट्ट्यानी दणाणला “संभवामि युगे युगे ” चा पहिला शो; परदेशातही सुरु आहे चर्चा!
2

मुंबईत टाळ्या शिट्ट्यानी दणाणला “संभवामि युगे युगे ” चा पहिला शो; परदेशातही सुरु आहे चर्चा!

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
3

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी
4

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.