Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
Mumbai Local: आता लोकलबाहेर लटकणे विसरा, ट्रेनच्या दरवाज्याच्या पन्हाळीत बदल करण्यास सुरुवात
कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलांसमोर अचानक वाघ दिसताच, त्यांनी काम अर्धवट सोडून माघार घेतली. वाघ शेतातच वावरत असल्याचे ट्रॅप कॅमेरा व ड्रोनद्वारे स्पष्ट झाले आहे. मात्र तरी देखील वनविभागाने तात्काळ ठोस कारवाई न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर उपसरपंच सुनील फरकडे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. (फोटो सौजन्य – Pinterest)
आमदारांनी तातडीने हस्तक्षेप करीत वनविभाग व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मंगळवारी (दि. २३) रात्री कोठारी वन कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांचे स्वीय सहायक संतोष अकतरे, सहायक उपवनसंरक्षक आदेशकुमार शेडगे, कोठारीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेखा मुरकुटे, बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र घोरुडे उपस्थित होते. बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला.
वन अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आल्याची माहिती देत परिसरात दिवसरात्र गस्त सुरू असल्याचे सांगितले. वाघाला शेतशिवारातून दूर ठेवण्यासाठी आठ ते दहा भोंगे बसविण्यात आले असून, ट्रॅप व ड्रोन कॅमेरांच्या माध्यमातून सतत नजर ठेवली जात असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बैलांची नुकसानभरपाई तत्काळ दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. शेतात काम करणाऱ्या महिलांसह शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत असून ग्रामस्थांनी संयम बाळगून वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.
Maharashtra Politics: मुंबई महापालिकेसाठी एकत्र येताच मनसेला मोठा धक्का; ‘हा’ बडा शिलेदार फुटला
मनुष्यबळ कमी असतानाही कडाक्याच्या थंडीत वनकर्मचारी जीव धोक्यात घालून गस्त घालत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीला उपसरपंच सुनील फरकडे, सुरेश रंगारी, ग्रामपंचायत सदस्य किशोर कोटरंगे, संतोष लोनगाडगे, अनिल विरुटकर, शंकर भटास्कर, गुरू यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.






