नवी मुंबईत नाताळच्या रात्री क्लब चालकांना पोलिसांकडून नाहक त्रास (Photo Credit- AI)
नेमका वाद काय?
25 डिसेंबर रोजी ख्रिश्चन समाजाचा नाताळ सण असतो. या सणाला ख्रिश्चन धर्मात फार महत्व आहे. त्यामुळे हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यासाठी ख्रिश्चन समाज संध्याकाळी बाहेर पडतो. आपला परिवार आणि नातेवाईक यांच्यासोबत हर्ष उल्हासाने साजरा करतात. मात्र हा सण साजरा करण्यासाठी क्लब चालकांना दिनांक 24 , 25 डिसेंबर व 31 डिसेंबर रोजी रात्री 10:30 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत परवानगी राज्य शासनाने दिली असताना ही, एपीएमसी हद्दीतील पोलीस अधिकारी या क्लब चालकांना नाहक त्रास देत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
पोलीस देत आहेत ‘ही’ कारणे
काही पोलीस अधिकाऱ्यांनी “नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून पहाटे ५ वाजेपर्यंत कोणतेही लेखी आदेश किंवा नोटिफिकेशन प्राप्त झालेले नाही” तसेच “आमच्याकडे मॅन पावर उपलब्ध नाही” असे पोलिसांकडून स्पष्टपणे सांगितल्याचा दावा क्लब चालकांनी केला आहे. विशेष म्हणजे, याच वेळी ऑर्केस्ट्रा बारसाठी पहाटेपर्यंत चालू आहे. क्लब चालकांवर मात्र निर्बंध लादले जात असल्याने दुजाभाव होत असल्याचा आरोप होत आहे.
गुंतवणुकीवर पाणी फिरण्याची भीती
काही ठिकाणी नियम नसल्याचे सांगत क्लब चालकांकडून ‘लक्ष्मी दर्शन’ ची अप्रत्यक्ष अपेक्षा व्यक्त केली जात असल्याचीही चर्चा व्यावसायिक वर्तुळात आहे. नाताळ व ख्रिसमस सणासाठी अनेक क्लब चालकांनी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन, कलाकारांचे बुकिंग, सजावट व तांत्रिक व्यवस्था यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी न झाल्यास या सर्व गुंतवणुकीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे मागणी
या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी तात्काळ स्पष्ट नोटिफिकेशन काढून सर्व पोलीस ठाण्यांना शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी क्लब चालक व संघटनांकडून करण्यात येत आहे. अन्यथा क्लब चालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत आणखी “कुटे कुटे” अश्या क्लब चालकांना शासन अध्यादेशबाबत चुकीची माहिती देतं त्रास देण्याचा प्रकार सुरु आहे हे वरिष्ठांनी तपासावे अशी मागणी देखील क्लब चालक करत आहेत. तसेच हा शासन निर्णय संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांना पाठवावेत जेणेकरून आयुक्तालय हद्दीतील इतर क्लब चालकांना हा त्रास सहन करावा लागणार नाही.






