Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: मुंरुड – जंजिऱ्यातील मोरबाई मंदीराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार; खासदार सुनील तटकरे यांचे अभिवचन

मोरे गावात बांधण्यात आलेल्या नवीन पुलाच्या लोकार्पणसाठी खासदार तटकरे गावात आले होते. यावेळी त्यांनी मोरबाई मंदिराला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार, असं अभिवचन दिलं आहे. या कार्यक्रमाला विविध मान्यवर उपस्थित होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 22, 2025 | 03:20 PM
Raigad News: मुंरुड - जंजिऱ्यातील मोरबाई मंदीराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार; खासदार सुनील तटकरे यांचे अभिवचन

Raigad News: मुंरुड - जंजिऱ्यातील मोरबाई मंदीराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार; खासदार सुनील तटकरे यांचे अभिवचन

Follow Us
Close
Follow Us:
  • मोरबाई मंदिराला ‘क’ वर्ग देणार
  • मुरूड तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प
  • नवीन पूल बांधण्यासाठी २८ लाखांचा निधी
मुरुड जंजिरा: नितांत सुंदर मोरे गावात टेकडीवर वसलेले मोरबाई मंदीर तसेच मंदीरावरून ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्याचे घडणारे दर्शन नयनरम्य आहे. या समुद्रालगतच्या संपूर्ण परिसराला येत्या तीन महिन्यात ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त करून देणार, अशी ग्वाही रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. विहर ग्रामपंचायत हद्दीत मोरे गावात असणारा जीर्ण पूल नवीन बांधण्यात यावा, अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती.

संभाजीनगरमध्ये सत्तारांचा ‘गड’ अभेद्य, वैजापुरात भाजपची बाजी; कन्नड-खुलताबादमध्ये काँग्रेसचा ‘धक्का’!

ग्रामस्थांच्या मागणी खातर सुमारे २८ लाखांचा निधी खासदार तटकरेंनी उपलब्ध करून दिला होता. आज त्या पुलाचे काम पूर्ण झाले. हा पूल वाहतुकीसाठी मोकळा करण्यासाठी या पुलाच्या लोकार्पणसाठी खासदार तटकरे मोरे गावात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मुरुड तालुक्यातील विहूर ग्रामपंचायत अंतर्गत मोरे गावातील रस्त्यावर बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन खासदार तटकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोरे ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष दत्तात्रय नाक्तींच्या हस्ते तटकरेंचा सत्कार केला. (फोटो सौजन्य – Facebook)

विविध मान्यवरांची हजेरी

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष फैरोज घलटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मनोज भगत, जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, माजी सरपंच अजित कासार, माजी सभापती स्मीता खेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक, माजी नगरसेवक विश्वास चव्हाण, सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष हसमुख जैन, सचिव विजय पैर, ऍड मृणाल खोत, सरपंच आशिष हेदुलकर, अनुराधा दांडेकर, दत्तात्रेय नाक्ती आदी उपस्थित होते.

हमी देत कागदाचा कपटा ही लिहून घेणार नाही!

खासदार सुनील तटकरे यांनी सांगितलं की, देश-विदेशातील पर्यटक आकर्षित होतील यासाठी मुरूड तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प आहे. विहूर ग्रामस्थांना पंचक्रोशी आगरी समाजासाठी सभागृहचे काम पूर्ण होईल. देवी मोरबाईच्या दर्शनाचा योग आला. देवीचे आशिर्वाद आमच्या पाठीशी आहेत.

Kalyan News : गोठ्यात घुसून तीन वासरांवर केला हल्ला; कल्याणमध्ये बिबट्याची दहशत

यावेळी तटकरे पुढे म्हणाले की, मोरबाई मंदीर परिसर विकसित करताना वन विभागाचा प्रश्न उद्भवला तर तोही निश्चितपणे सोडवून भविष्याच्या काळात भाविकांचा व पर्यटकांचा ओघ वाढवण्यासाठी मुलभूत सुविधा देण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी पक्षाच्या घोषवाक्यानुसार जनतेच्या हितासाठी काम करत आलो आहे आणि कर्तव्य भावनेने काम करतच राहणार. पण गावकी-भावकी वा अटी-शर्ती, स्टँप पेपरवर न लिहून घेता करणार, अशी हमी देत कागदाचा कपटा ही लिहून घेणार नाही. जनतेवर विश्वास असला पाहिजे. जनतेच्या हृदय सिंहासनावर कोरले जाईल अशीच भूमिका आपली राहील असे संकेत दिले.

Web Title: Boost for raigad tourism muruds morbai temple to be declared a pilgrimage center soon raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • Murud-Janjira
  • raigad
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Maharashtra Local Body Election Result 2025 : श्रीवर्धन नगरपरिषदेत तटकरेंना मोठा धक्का, उबाठाचे अतुल चौगुले नगराध्यक्षपदी विजयी
1

Maharashtra Local Body Election Result 2025 : श्रीवर्धन नगरपरिषदेत तटकरेंना मोठा धक्का, उबाठाचे अतुल चौगुले नगराध्यक्षपदी विजयी

Raigad News : अनधिकृत मासेमारीवर मत्स्यविभागाची कारवाई; मच्छिमारांच्या नौका केल्या जप्त
2

Raigad News : अनधिकृत मासेमारीवर मत्स्यविभागाची कारवाई; मच्छिमारांच्या नौका केल्या जप्त

रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला यश; १५१ रुग्णांची ओळख
3

रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला यश; १५१ रुग्णांची ओळख

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष
4

Raigad News: कळंबोलीत राजकीय वातावरण तापलं! प्रचाराचा बिगुल वाजला, मतदारांवर लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.