Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रायगडच्या पर्यायी मार्गावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चानंतरही प्रवास धोकादायक, ग्रामस्थ संतप्त

रायगड किल्ला परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी तयार केलेला खर्डी नगरभवन-नेवाळीवाडी पर्यायी मार्ग पुन्हा वादात सापडला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या रस्त्यावर नागरिकांनी सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2026 | 02:13 PM
Raigad News: रायगडच्या पर्यायी मार्गावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चानंतरही प्रवास धोकादायक, ग्रामस्थ संतप्त

Raigad News: रायगडच्या पर्यायी मार्गावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधी खर्चानंतरही प्रवास धोकादायक, ग्रामस्थ संतप्त

Follow Us
Close
Follow Us:
  • रायगडकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील वाहतूक कमी करण्यासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता अजूनही धोकादायक ठरत आहे.
  • दोनदा दुरुस्ती करूनही मार्गावरील तीव्र उतार आणि अरुंद वळणांचा प्रश्न कायम आहे.
  • स्थानिकांनी तातडीने तांत्रिक फेरआढावा घेऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
महाड: किल्ले रायगड परिसराच्या विकासासाठी विविध पायाभूत सुविधा उभारल्या जात असताना, खर्डी नगरभवन-नेवाळीवाडी मार्गाच्या कामावर झालेला कोट्यवधींचा खर्च वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. २०२४ मध्ये पर्यायी मार्ग म्हणून सुरू करण्यात आलेला हा रस्ता आजही धोकादायकच राहिल्याने प्रशासनाच्या नियोजनक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिव्यांगांच्या हक्कावर शासनाची कुऱ्हाड; तात्पुरते प्रमाणपत्र असणारे बालके योजनांपासून वंचित

रायगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य महाड-रायगड मार्गावरील वाढती वाहतूककोंडी कमी करण्यासाठी हा पर्यायी मार्ग विकसित करण्यात आला. रोपवे परिसरातून नेवाळी-खर्डी मार्गे किल्ल्याकडे पोहोचण्याची सुविधा निर्माण करण्याचा उद्देश होता. मात्र, अल्पावधीतच या मार्गावरील तीव्र उतार, उभे चढ आणि धोकादायक वळणांमुळे तो बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली.

स्थानिक ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच या मार्गाच्या आराखड्यावर आक्षेप घेत, पर्यायी दिशा सुचविल्या होत्या. तथापि, त्या दुर्लक्षित राहिल्याचा आरोप होत आहे. गेल्या दोन वर्षांत दोनदा दुरुस्ती करूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. एका टप्प्यावर रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याचीही नोंद आहे. नगरभवन ते नेवाळी दरम्यानचा डोंगराळ पट्टा अत्यंत खडतर असून, सरळ उभे चढ आणि अरुंद वळणे यामुळे मोठ्या बसगाड्या तर दूरच, लहान वाहने चालवितानाही चालकांना मोठी कसरत करावी लागते.

तातडीने मार्गाच्या तांत्रिक फेरआढाव्याची मागणी

परिणामी, स्थानिक नागरिकांनी या मार्गावरील प्रवास टाळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नेवाळी गावाखालच्या घाटमाथ्यावर सध्या रुंदीकरणाची कामे सुरू असली तरी, मूळ रचनेतील त्रुटी कायम असल्याने धोका अद्याप टळलेला नाही. अपघाताची शक्यता लक्षात घेता तातडीने तांत्रिक फेरआढावा घेण्याची मागणी पुढे येत आहे.

सलग तीन वर्षे एकाच ठेकेदाराकडून काम सुरू

दरम्यान, सलग तीन वर्षे एकाच ठेकेदाराकडून काम करून घेतल्याने दर्जाबाबत शंका व्यक्त होत आहेत. संबंधित ठेकेदाराकडे आवश्यक यंत्रसामग्री व अनुभव नसतानाही काम देण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून रायगड प्राधिकरणामार्फत लवकरात लवकर या कामाची पाहणी करून यावर उपाययोजना कराव्यात जेणेकरून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना सहज सुलभ व सुरक्षितरित्या प्रवास करता येईल अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

पीएमआरडीएमध्ये अंतर्गत बदल्यांसाठी जोरदार फिल्डिंग! दबावतंत्राचा वाढता प्रभाव; आयुक्तांच्या भुमिकेकडे लक्ष

नेवाळीपासून पुढील जोडमार्गाबाबत आम्ही पर्याय सुचविला होता; मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली. – यशवंत आखाडे, स्थानिक नागरिक

भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता केवळ ठेकेदारांच्या फायद्यासाठी काम करण्यात आले. या मार्गावर अपघात झाल्यास संबंधित अधिका-यांवर जबाबदारी निश्चित व्हावी. – सुभाष मोरे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Crores spent yet unsafe alternative road to raigad fort raises safety concerns raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • raigad
  • Raigad Fort

संबंधित बातम्या

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त
1

Karjat News: 640 एकर वनजमिनीवर वाद! टोरंट प्रकल्पामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहावर संकट? पाली भागातील आदिवासी संतप्त

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
2

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Raigad News: उकाड्यामुळे ग्राहक घरातच; महाड बाजारपेठेतील वर्दळ घटली, व्यापारी चिंतेत
3

Raigad News: उकाड्यामुळे ग्राहक घरातच; महाड बाजारपेठेतील वर्दळ घटली, व्यापारी चिंतेत

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती
4

Chandrapur News: एसटी आगारातील वातावरण तापले; कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट, प्रवासी सेवांवर परिणाम होण्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.