Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ, परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 20, 2026 | 06:20 PM
चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ, परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर

चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ, परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटींचा निधी मंजूर

Follow Us
Close
Follow Us:
  • चवदार तळे सत्याग्रहातून समतेची मुहूर्तमेढ
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती
  • शताब्दी वर्षात समतामूलक भारताचा संकल्प
 

रायगड : महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समतेचा, सामाजिक न्यायाचा आणि संविधानिक मूल्यांचा पुनरुच्चार करत भेदभावमुक्त समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेला हा सत्याग्रह केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवतेच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा होता, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाड (रायगड) येथे चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शताब्दी वर्ष कार्यक्रमाचा आरंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी 55 कोटी 80 लाख निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचे भूमी पूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चवदार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णांकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून मानवंदना देण्यात आली.

KDMC News : अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणी मिळेना; MIDCचा पाणी बिलावर ‘डिपॉझिट’ धक्का!

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आपल्या भाषणाची सुरुवात करीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 1923 मध्ये सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले करण्याचा कायदा झाला तरी समाजातील काही घटकांनी त्याची अंमलबजावणी रोखली. या अन्यायाविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेला चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक समतेचा क्रांतिकारी टप्पा ठरला. हा संघर्ष केवळ पाणी पिण्यासाठी नव्हता, तर विषमता आणि अस्पृश्यतेच्या व्यवस्थेविरुद्ध उभारलेला मानवतेचा लढा होता. या सत्याग्रहामुळे देशातील सर्व सार्वजनिक पाणवठे सर्वांसाठी खुले झाले आणि समतेची पायाभरणी झाली. पुढील पिढीपर्यंत हा संघर्षाचा इतिहास पोहोचविण्याची गरज आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी चवदार तळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामाचा उल्लेख करत, हे ठिकाण स्वच्छ, पवित्र आणि प्रेरणादायी स्वरूपात विकसित केले जाईल, असे सांगितले. तसेच राज्य सरकारतर्फे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. अनुसूचित जातींवरील अत्याचारातील पीडित कुटुंबातील 98 जणांना शासकीय सेवेत नियुक्ती निर्णय, पीपल्स एज्युकेशन सोसायटीला दिलेला निधी, चैत्यभूमीवरील स्मारकाचे काम, तसेच लंडन व जपानमध्ये बाबासाहेबांच्या स्मृती जपण्यासाठी केलेल्या उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.

याशिवाय, बौद्धगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या नावाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यासन स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. “भारतीय संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. या संविधानामुळेच भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे विषमता आणि अस्पृश्यता संपवून समतामूलक समाज निर्माण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा,” असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर भव्य ‘भीमसृष्टी’ स्मारक उभारण्याची सूचना मांडली. या ऐतिहासिक स्थळाचा जागतिक दर्जाचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समानता व सामाजिक न्यायाच्या विचारांवर मार्गक्रमण करत समाजातील एकजूट अधिक मजबूत करण्याचे आवाहन करीत देश आणि राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचेही राज्यमंत्री आठवले यांनी नमूद केले.

महाड येथील चवदार तळ्याच्या विकासासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगत रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी हा प्रकल्प शताब्दी वर्षापूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी येथे आधुनिक सुविधा निर्माण करण्यावर भर देत, रायगड येथे ‘शिवसृष्टी’ आणि महाड येथे ‘भीमसृष्टी’ उभारुन या ऐतिहासिक स्थळांचा सर्वांगीण विकास करून सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा अधिक भक्कम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट प्रास्ताविक भाषणात म्हणाले, महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या विकासासाठी सुमारे ५५ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या ठिकाणाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची सुरुवात याच ठिकाणाहून झाल्याने या स्थळाला जागतिक स्तरावर नेण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिक्षण, वसतिगृह आणि सामाजिक न्यायाच्या योजनांद्वारे बहुजन समाजाच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा देशातील पहिला उपक्रम

अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील वारसांपैकी छाया अश्विन कांबळे यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मुलींचे शासकीय वसतिगृह, गौरीपाडा, कल्याण पूनम दिनेश जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, शहापूर सारिका बलभीम बनसोडे यांना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अनुष्का सुरेंद्रकुमार यांना मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, गोधळपाडा, अलिबाग, पुजा नितीन मस्के यांना संत जनाबाई मुलीचे शासकीय वसतिगृह, पुणे धिरज प्रकाश पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर, अशा एकूण ९८ वारसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय सेवेत नियुक्तीचे आदेश वितरण करण्यात आले.

Pune ZP : अध्यक्षपदाचा ‘फॉर्म्युला’ अद्याप गुप्तच; जिल्हा परिषदेत सत्ताधाऱ्यांचा डाव की संभ्रम?

Web Title: Devendra fadnavis on chavdar tale satyagraha legacy news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 06:20 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • raigad

संबंधित बातम्या

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या
1

कौशल्य विकासावर भर; रतन टाटा कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा संपन्न, २५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना पदव्या

Raigad News: गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त
2

Raigad News: गॅस संकटाचा परिणाम! इंडक्शन शेगड्यांचे दर गगनाला भिडले, ग्राहक संतप्त

Raigad Crime: बकरीच्या वादातून हत्या; 21 वर्षे फरार आरोपी अखेर जेरबंद, रायगड पोलिसांची मोठी कारवाई
3

Raigad Crime: बकरीच्या वादातून हत्या; 21 वर्षे फरार आरोपी अखेर जेरबंद, रायगड पोलिसांची मोठी कारवाई

Raigad News: 21 एप्रिलपासून महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप? 17 लाख कर्मचाऱ्यांनी दिला इशारा
4

Raigad News: 21 एप्रिलपासून महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी-शिक्षकांचा बेमुदत संप? 17 लाख कर्मचाऱ्यांनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.