Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: इमारत तयार, पण रुग्णालय सुरू होईना! खोपोलीकरांची प्रतिक्षा कायम, नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

खोपोलीत इमारत उभी राहूनही रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झालेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. रुग्णालय अखेर कधी सुरु होणार असा प्रश्न देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 16, 2026 | 02:33 PM
Raigad News: इमारत तयार, पण रुग्णालय सुरू होईना! खोपोलीकरांची प्रतिक्षा कायम, नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Raigad News: इमारत तयार, पण रुग्णालय सुरू होईना! खोपोलीकरांची प्रतिक्षा कायम, नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • अद्याप रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल झालेले नाही
  • इमारत उभी राहूनही रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झालेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी
  • प्रकल्पासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ४० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची घोषणा
खोपोली: खोपोली शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि सुसज्ज आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्ण होऊनही प्रत्यक्ष आरोग्यसेवा कधी सुरू होणार, असा प्रश्न आता खोपोलीकरांकडून उपस्थित केला जात आहे. सुमारे ३ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या रुग्णालयाच्या भूमिपूजनाला अडीच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत दाखल झालेले नसल्याने नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Student Kidnapping: पिंपरी-चिंचवड हादरले! महाविद्यालयीन तरुणाचे दिवसाढवळ्या भररस्त्यात अपहरण अन् चौकात नेऊन…

खोपोली नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी जुन्या रुग्णालयाच्या इमारतीऐवजी नवीन सुसज्ज इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ११ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थानिक आमदार, माजी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत या नवीन रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून ४० बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, भूमिपूजनाच्या वेळी मोठ्या उत्साहात करण्यात आलेल्या घोषणांनंतर प्रत्यक्ष रुग्णालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळाली नसल्याचे चित्र आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

भूमिपूजनाचा गाजावाजा, लोकार्पणाला विलंब का?

रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम पूर्णत्वाकडे गेल्यानंतर नागरिकांमध्ये आरोग्यसेवा सुरू होण्याबाबत अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र, इमारत उभी राहूनही रुग्णालय प्रत्यक्षात सुरू झालेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. इमारत उभारण्यात आली; मग आता रुग्णालय सुरू करण्यासाठी नेमकी कोणती अडचण निर्माण झाली आहे? काम पूर्ण झाले असल्यास लोकार्पण आणि आरोग्यसेवा सुरू करण्यास विलंब का होत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

अपघातग्रस्तांना दिलासा

विशेष म्हणजे, या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामाची सद्यस्थिती, झालेला खर्च, उर्वरित कामे आणि रुग्णालय सुरू करण्याची निश्चित तारीख याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांसमोर स्पष्ट माहिती येणे आवश्यक आहे. खोपोली शहरात ४० बेडचे रुग्णालय सुरू झाल्यास नागरिकांसह अपघातग्रस्तांसाठीही दिलासा मिळू शकतो.

Children Day Celebration : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बालस्वप्नांचा आनंदोत्सव; जवाहर बाल भवनात बालदिन उत्साहात साजरा!

प्रक्रिया प्रशासकीय तातडीने पूर्ण करा!

  • रुग्णालयाच्या कामाची सद्यस्थिती जाहीर करून ते सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय यंत्रणा, कर्मचारी भरती आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण कराव्यात.
  • तसेच रुग्णालय सुरू करण्याची निश्चित तारीख नगरपरिषदेने जाहीर करावी. नगरपरिषद प्रशासनाने या सर्व बाबींची पूर्तता करून रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी ठोस पावले उचलावीत.
  • रुग्णालय सुरू करण्यासाठी केवळ इमारत पूर्ण असणे पुरेसे नाही. येथे पुरेसे डॉक्टर, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक उपचार यंत्रणा, ऑपरेशन थिएटर, विविध वैद्यकीय उपकरणे तसेच आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध करून द्या.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Khopoli hospital ready but yet to open citizen question delay in launch of 3 crore hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Gold Silver Price Crash: ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव गडगडले! किंमतीत मोठी पडझड, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा?
1

Gold Silver Price Crash: ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव गडगडले! किंमतीत मोठी पडझड, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा?

Jimmy Tata News: रतन टाटांचे धाकटे बंधू अखेर बोलले! Tata Groupमधील वादात चुलत भावाविरोधात घेतली भूमिका
2

Jimmy Tata News: रतन टाटांचे धाकटे बंधू अखेर बोलले! Tata Groupमधील वादात चुलत भावाविरोधात घेतली भूमिका

Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!
3

Chhatrapati Sambhajinagar: “लॉटरी लागली म्हणून खाऊ घातला पेढा अन्…” ओळखीच्या नराधमाचे विवाहितेला औषध देऊन केले अघोरी कृत्य!

High Paying Jobs: टेक जायंट्समध्ये काम करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! मोठ्या कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना कसा मिळतो जॉब?
4

High Paying Jobs: टेक जायंट्समध्ये काम करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! मोठ्या कंपन्यांमध्ये फ्रेशर्सना कसा मिळतो जॉब?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.