Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा

सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांच्या उपोषणाचा चौथा दिवस उपोषणकर्त्यांसाठी यशस्वी ठरला. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मध्ये खऱ्या अर्थाने कचऱ्यावर विघटन व्हावे यासाठी प्रशिक्षण पासून कार्यवाही सुरू केली जाईल असे आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 02, 2026 | 03:13 PM
Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा

Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा

Follow Us
Follow Us:
  • सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांच्या नेरळमधील उपोषणाच्या चौथ्या दिवशी आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
  • ग्रामपंचायतीतील मागील पाच वर्षांतील कारभाराचा अहवाल १० दिवसांत सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
  • विविध मागण्यांवर आश्वासने मिळाल्यानंतरही कल्याण-कर्जत रस्ता अतिक्रमणमुक्त होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार गोरख शेप यांनी व्यक्त केला.
कर्जत: कर्जत तालुक्यात गाजत असलेले सामाजिक कार्यकर्ते गोरख शेप यांच्या उपोषणाचा चौथा दिवस उपोषणकर्त्यांसाठी यशस्वी ठरला. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यस्थीनंतर अनेक विषय मार्गी लागले आहेत. मात्र अतिक्रमण विरोधी कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार यावेळी जाहीर केला.

देवस्थान इनामाच्या 111.6 गुंठ्यांच्या जमिनीबाबत गैरव्यवहाराचा आरोप; हेमंत मोरेंनी केली महत्त्वाची मागणी

नेरळ गावातील नागरी समस्या आणि रस्त्यांवरील अतिक्रमण याविरुद्ध २८ सप्टेंबरपासून सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते नितीन सावंत यांच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

गुरूवारी आमदार महेंद्र थोरवे हे उपोषण स्थळी पोहचले आणि त्यांनी गोरख शेप यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सर्व अधिकारी वर्ग बोलावला होता. आमदार महेंद्र थोरवेंनी एक एक करून सर्व विषयांची माहिती घेतली. त्यानंतर नेरळ नगरपरिषद किंवा नगरपंचायत व्हावी यासाठी आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लागावा, असे आश्वासन दिले.  (फोटो सौजन्य – AI Created) 

ग्रामपंचायतीमधील मागील ५ वर्षे आणि प्रशासक काळातील गैरव्यवहारांची गटविकास अधिकाऱ्यांनी १० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच दोषर्षीवर कार्यवाही करण्याची सूचना आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारींना सूचना करू, असे म्हटले.

आमदार या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्व अधिकारी वर्गाला आदेश दिल्याने उपोषण करताना घेतलेले अनेक विषय मार्गी लागत आहेत, याबद्दल आमदारांचा आभारी आहे. जोवर कल्याण-कर्जत रस्ता अतिक्रमण मुक्त होत नाही तोवर आपले उपोषण सुरूच राहील. – गोरख शेप, सामाजिक कार्यकर्ते

आमदार महेंद्र थोरवेंच्या भेटीमधील महत्वाचे मुद्दे

नेरळ गावातील डंपिंग ग्राउंडच्या जमीन कोणी हडप केली? असा आरोप केला जात आहे. तेथील जागा निश्चितीसाठी ग्रामपंचायतीने मोजणीसाठी पैसे भरले असून मोजणी करून जमीन बळकावली असेल तर तत्काळ कारवाई कैली जाईल, असे आश्वासन दिले.

Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मध्ये खऱ्या अर्थाने कचऱ्यावर विघटन व्हावे यासाठी प्रशिक्षण पासून कार्यवाही सुरू केली जाईल असे आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले. नळपाणी योजना ही निधी अभावी रखडली असून त्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक केली जाईल आणि निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच नळपाणी योजना में २०२७ पूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Gorakh shep protest in neral enters fourth day mla mahendra thorve intervenes on key demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत  ‘युवा निर्धार मेळावा’
1

Pune BJP :भारतीय जनता युवा मोर्चाचा उद्या जेजुरीत ‘युवा निर्धार मेळावा’

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश
2

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
3

BUMS Student: दोन विषय राहिले तरी पुढचं वर्ष अडणार नाही! BUMS विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान
4

Sangli River: कृष्णा नदी वाचवण्यासाठी शेकडो विद्यार्थी अन् नागरिक रस्त्यावर; महास्वच्छता अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.