Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्जतमधील राजनाला कालव्याचे मोठे नुकसान; 2 हजार हेक्टर शेतीच्या पाणीपुरवठ्यावर संकट, शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी

कर्जत तालुक्यातील सुमारे 2 हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या राजनाला कालव्याचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. डिसेंबरमध्ये दुबार शेतीसाठी पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 19, 2026 | 02:05 PM
कर्जतमधील राजनाला कालव्याचे मोठे नुकसान; 2 हजार हेक्टर शेतीच्या पाणीपुरवठ्यावर संकट, शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी

कर्जतमधील राजनाला कालव्याचे मोठे नुकसान; 2 हजार हेक्टर शेतीच्या पाणीपुरवठ्यावर संकट, शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Follow Us
Follow Us:
  • कर्जत तालुक्यातील सुमारे 2 हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या राजनाला कालव्याचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणचे कॉंक्रिटीकरण वाहून गेले आहे.
  • कालव्याच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून यामुळे कालवा आणि शेतीकडे जाणारे रस्तेही खचून वाहून गेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
  • जलसंपदा विभागाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असून डिसेंबरपूर्वी काम पूर्ण करून दुबार शेतीसाठी नियोजनानुसार पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
कर्जत तालुक्यातील २००० हेक्टर जमीन ओलिताखाली आणणाऱ्या राजनाला कालव्याचे मोठे नुकसान काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे झाले आहे. कालव्याच्या कराळेवाडी – हेदवळी – सावळे भागातील नाल्याला या पावसाचा फटका बसला आहे. दुबार शेतीचा हंगाम डिसेंबर महिन्यात सुरु होतो. त्याआधी कालव्याची दुरुस्ती जलसंपदा विभागाने करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. दरम्यान जलसंपदा विभागाकडून या कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून यावर्षी दुबार शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन केले आहे.

माथेरान मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिनची जोड; ब्रिटिश काळातील वाफेच्या इंजिनाचाच नवा फंडा

राजनाला कालव्याच्या उजवा कालवा म्हणजे कराळेवाडी-मांडवणे-हेदवली-सावळे गावापर्यंत जाणारा कालवा असून या कालव्यामुळे शेकडो एकर जमीन ओलीताखाली येत असते. या कालव्यामुळे दुबार शेतीसाठी शेतकऱ्यांना चालना मिळत असते. २०२३ ते २०२४ रोजी या कालव्याला पाणी सोडले असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये भाताचे पीक पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे कालव्याचे अनेक भागात नुकसान झाले आहे.

कालव्याच्या काही नाल्याचा कॉंक्रिटीकरण पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीकडे जाणारा मार्गही या नाल्याच्या निकृष्ट कामामुळे पूर्णपणे वाहून गेला आहे. शेतकऱ्यांचा ये जा करणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. २०२६ मध्ये या नाल्याच्या कामाला सुरुवात झाली. परंतु हे काम चालू असताना पाटबंधारे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्याचr तक्रार देखील स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान हेदवली येथील शेतकरी हरिचंद्र म्हसकर, राम गायकर, संतोष जोशी, झिपा जोशी, मंगल जोशी असे अनेक शेतकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Mumbai News: लोकल प्रवासावर हिंसाचाराचे सावट! किरकोळ संभाषणही सहन होईना, समाज पोहोचला ‘टिपिंग पॉइंट’ वर

उजवा कालव्याचे बांधकाम केले जात असताना आम्ही शेतकरी म्हणून आमच्या नाल्याचे निष्कृष्ट दर्जाचे काम चालू आहे. अधिकाऱ्यांना लक्ष दिले असते तर कालव्याला धोका पोहचला नसता. – हरिचंद्र म्हसकर, शेतकरी

यावर्षी काम पूर्ण करून पुढच्या वर्षी २०२६ ते २०२७ मध्ये शेतीसाठी पाणी सोडणार होते. डिसेंबर महिन्यापर्यंत जी नाल्याची दुरावस्था झाली आहे ते पूर्ण करून आम्हाला पाणी सोडण्यात यावे. – राम गायकर, शेतकरी

Web Title: Heavy rains damage rajnala canal in karjat farmers demand immediate repairs before rabi season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 02:05 PM

Topics:  

  • Karjat
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश
1

Buldhana News : दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन; ‘भीक मांगो’ करत सरकारविरोधात आक्रोश

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल
2

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.