Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought 2026: पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात

Maharashtra Drought 2026: कर्जत तालुक्यात १५ सप्टेंबरपासून पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटात सापडली आहे. यंदा लागवड उशिरा झाल्याने ऑक्टोबर सुरू होऊनही भातपीक पूर्णपणे तयार झालेले नाही. शेतातील पाणी संपत असून आवश्यक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुरू केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 05, 2026 | 12:46 PM
पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात

पावसाने दडी मारली, कर्जतवर दुष्काळाचे सावट; हजारो हेक्टरवरील भातपीक धोक्यात

Follow Us
Follow Us:
  • १५ सप्टेंबरपासून पाऊस गायब
  • कर्जतमध्ये भाताच्या कोंबाची प्रतीक्षा
  • हिरवीगार शेती पण हाती पीक येणार का?
Maharashtra Drought 2026: भातशेतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यावर आता दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. १५ सप्टेंबरपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी कमी झाले असून भातपीक संकटात सापडले आहे. अनेक ठिकाणी अद्याप भाताचे कोंब बाहेर आलेले नसल्याने पीक हातात येईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

कर्जत तालुका पूर्वी मोठ्या प्रमाणातील भातशेतीसाठी प्रसिद्ध होता. एकेकाळी तालुक्यात सुमारे २५ ते २७ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची शेती केली जात होती. मात्र, फार्म हाऊस आणि सेकंड होमसाठी मोठ्या प्रमाणावर जमिनी विकल्या गेल्याने भातशेतीचे क्षेत्र घटत गेले. आता हे क्षेत्र दहा हजार हेक्टरपेक्षाही कमी झाले आहे. यंदा तर जेमतेम सहा हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Raigad News: पाताळगंगा नदीकाठच्या तलावांमध्ये कथित बेकायदा मांगूर पालन; परिसरातील नागरिकांची प्रशासनाकडे तक्रार

जूनअखेरीस पावसाला सुरुवात

यंदा जूनमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. जूनअखेरीस पावसाला सुरुवात झाली आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत चांगला पाऊस झाला. तीन हजार मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होऊनही सुरुवातीच्या विलंबामुळे भात लागवडीचे वेळापत्रक कोलमडले. सामान्यतः जुलैच्या मध्यापर्यंत लावणी पूर्ण होते; मात्र यंदा ऑगस्टपर्यंत लावणी सुरू होती. परिणामी पीक तयार होण्यास उशीर झाला.

दरवर्षी सप्टेंबरअखेरीस शेतात भाताचे ‘पिवळे सोने’ डोलताना दिसते. मात्र यंदा ऑक्टोबर सुरू होऊनही अनेक शेतांतील पीक तयार झालेले नाही. त्यातच १५ सप्टेंबरनंतर आवश्यक पाऊस न झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असला तरी त्याचा शेतीला अपेक्षित फायदा झालेला नाही. भातपीक पूर्ण होण्यासाठी सलग आणि पुरेशा पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतातील पाणी कमी होत असल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कर्जत तालुक्यात दुष्काळ जाहीर…

या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी कर्जत तहसीलदारांची भेट घेऊन प्रशासनाकडेही ही मागणी मांडली आहे.

सध्या अनेक भागांतील भातशेती वरकरणी हिरवीगार दिसत असली तरी पाण्याअभावी पीक बहरण्याची शक्यता कमी असल्याची चिंता शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत पाऊस न झाल्यास कर्जत तालुक्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

Raigad: दिवेआगर दुर्घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभारण्याची पंडित पाटील यांची मागणी

Web Title: Karjat drought like situation rainfall stops paddy crops in danger farmers demand drought declaration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 12:46 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • raigad

संबंधित बातम्या

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
1

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
2

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम
3

Malegaon Temperature: अश्विनमध्ये ‘चैत्राचा दणका’; मालेगावात पारा ३८.२ अंशांवर, नागरिक घामाघूम

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
4

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.