Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ‘सनाधरा रिसॉर्ट’मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

कर्जत तालुक्यातील सांगवी येथील सनाधरा रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळून मनोज नावाचा कामगार तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. लोखंडी बीममध्ये अडकल्याने तो गंभीर संकटात सापडला होता. खोपोलीच्या हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तब्बल पाच तास अथक प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 29, 2026 | 01:53 PM
'सनाधरा रिसॉर्ट'मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

'सनाधरा रिसॉर्ट'मध्ये मृत्यूचा सापळा; निष्काळजीपणामुळे दोन मजले कोसळले, स्लॅब कोसळून कामगार गंभीर जखमी

Follow Us
Follow Us:
  • कर्जतमध्ये रिसॉर्टच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
  • पाच तासांच्या थरारक रेस्क्यूमध्ये कामगाराला जीवदान
  • परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामात मोठा अपघात?
कर्जत : कर्जतमधून एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक प्रकार घडला. सांगवी येथील ‘सनाधरा रिसॉर्ट’मध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळण्याची घटना घडली. सांगवी येथील सनाधरा रिसॉर्ट मध्ये सुरू असलेल्या बांधकाम यांना कोणतीही अधिकृत परवानगी नाही, ना कुठला आर्किटेक्ट, ना कुठला इंजिनिअर.अशा स्थितीत फक्त आणि फक्त पैशांची हाव आणि मालकाचा बेजबाबदारपणा आणि याच हलगर्जीपणामुळे महिनाभरापूर्वी टाकलेला अख्खा स्लॅब पत्त्यासारखा कोसळला.

रविवारी सायंकाळी 5.30 सुमारास जेव्हा हा ढिगारा कोसळला, तेव्हा वेल्डिंगचं काम करणारा मनोज नावाचा उत्तर भारतीय कामगार थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. लोखंडी अवजड बीममध्ये त्याचा पाय असा काही अडकला, की तो थेट मृत्यूच्या दारात उभा होता. पण म्हणतात ना, ‘देव तारी त्याला कोण मारी अशी घटना तेथे पाहायला मिळाली.

Karjat News: 55 हजार वीज ग्राहकांना मोठा दिलासा! ‘या’ परिसरात महावितरणचे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू

या घटनेची माहिती मिळताच खोपोलीच्या ‘हेल्प फाउंडेशन’चे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांची टीम जीवाची बाजी लावून घटनास्थळी पोहोचली. वरून कधीही कोसळेल अशा अत्यंत धोकादायक स्ट्रक्चरच्या खाली उभे राहून, तब्बल ५ तास या रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न केले आणि अखेर मृत्यूच्या जबड्यातून मनोजला सुखरूप बाहेर काढलं. या भीषण अपघातात फक्त मनोजच नाही, तर तिथं काम करणारे तीन स्थानिक आदिवासी बांधवही जखमी झालेत, त्यांच्यावर सध्या कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या रिसॉर्ट चालकाने एवढं मोठं तीन मजली स्ट्रक्चर उभं करताना कोणत्याही तज्ज्ञाचा सल्ला घेतला नव्हता. हा सरळ सरळ निष्पाप लोकांच्या जिवाशी केलेला खेळ आहे. घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, अनिल सोनोने आणि त्यांच्या पथकाने तात्काळ धाव घेतली असून पोलीस आता याप्रकरणी चौकशी करत आहेत.

स्लॅब अचानक कोसळला

रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. त्यावेळी वेल्डिंगचे काम करणारा मनोज नावाचा उत्तर भारतीय कामगार तिसऱ्या मजल्यावर काम करत होता. स्लॅब कोसळताच तो खाली पडला आणि लोखंडी बीममध्ये त्याचा पाय अडकल्याने तो ढिगाऱ्याखाली अडकून पडला. घटनास्थळावरील परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. इमारतीचा उर्वरित भागही कधीही कोसळू शकत असल्याने बचावकार्य मोठ्या जोखमीचे ठरले.

पाच तासांची जीवघेणी बचावमोहीम

घटनेची माहिती मिळताच खोपोली येथील हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जीवाची पर्वा न करता बचाव पथकाने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. सुमारे पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर मनोजला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

Karjat News : टोरंट कंपनीचा प्रताप! जलविद्युत प्रकल्पासाठी नियम धाब्यावर? आदिवासींच्या जमिनीत अवजड मशिनरी, ग्रामस्थांचा संताप

बांधकामाविषयी गंभीर आरोप

या घटनेनंतर स्थानिकांकडून बांधकामाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. संबंधित बांधकामासाठी आवश्यक परवानग्या, वास्तुविशारद किंवा अभियंत्यांचे मार्गदर्शन नसल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. या आरोपांची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. संबंधित प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

चौकशीची मागणी

या दुर्घटनेनंतर संबंधित बांधकामाची वैधता, सुरक्षा मानकांचे पालन आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

Web Title: Karjat resort slab collapse worker rescue sangvi help foundation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • building collapse
  • Karjat
  • maharashtra

संबंधित बातम्या

Satara News : कास पठारावरील बांधकामांवरून नवा वाद; सिमेंट वापराच्या आरोपांमुळे जागतिक वारसा दर्जावर प्रश्नचिन्ह?
1

Satara News : कास पठारावरील बांधकामांवरून नवा वाद; सिमेंट वापराच्या आरोपांमुळे जागतिक वारसा दर्जावर प्रश्नचिन्ह?

ST Employees: वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्याला मंजुरी; एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईकांचे मानले आभार
2

ST Employees: वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्याला मंजुरी; एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईकांचे मानले आभार

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?
3

Maharashtra Weather: वेळीच सावध व्हा! महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता, २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट, कुठे किती बरसणार?

Satara News : सुर्लीच्या लेकीची आंतरराष्ट्रीय झेप! अंजली वेताळने आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पटकावले कांस्यपदक
4

Satara News : सुर्लीच्या लेकीची आंतरराष्ट्रीय झेप! अंजली वेताळने आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत पटकावले कांस्यपदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.