Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: पराभवानंतरही ओझर्डेंची सामाजिक बांधिलकी कायम; गणेशभक्तांसाठी पुन्हा मोफत एसटी सेवेची घोषणा

महाड विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांसाठी सोमनाथ ओझर्डे यांनी १२ आणि १३ सप्टेंबरला मोफत बससेवा सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नालासोपारा येथून बस सोडून यंदा सुमारे १० हजार नागरिकांना सेवेचा लाभ देण्याचे नियोजन आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 09, 2026 | 02:46 PM
Raigad News: पराभवानंतरही ओझर्डेंची सामाजिक बांधिलकी कायम; गणेशभक्तांसाठी पुन्हा मोफत एसटी सेवेची घोषणा

Raigad News: पराभवानंतरही ओझर्डेंची सामाजिक बांधिलकी कायम; गणेशभक्तांसाठी पुन्हा मोफत एसटी सेवेची घोषणा

Follow Us
Follow Us:
  • मुंबई, पुणे, ठाणे, नालासोपारा आदी ठिकाणांहून महाडकडे मोफत बससेवा.
  • यंदा संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सेवेचा लाभ मिळणार.
  • निवडणुकीतील पराभवानंतरही सामाजिक उपक्रम सुरू ठेवण्याचा सोमनाथ ओझर्डेंचा निर्धार.
महाड: जिल्हा परिषद निवडणुकीतील अपयशानंतरही सामाजिक बांधिलकी कायम ठेवत शिरगावचे सरपंच तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उपजिल्हा समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी गणेशोत्सवानिमित्त गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेली मोफत एसटी बससेवा यंदाही सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. यंदा या उपक्रमाची व्याप्ती वाढवून संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांना या सेवेचा लाभ देण्यात येणार आहे.

Raigad News: कर्जतच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा? तालुका ओला-उबरसाठी खुला करण्याची भूमिपुत्र संघटनेची मागणी

जिल्हा परिषद निवडणुकीनंतर ओझर्डे यांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शनिवार ८ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, महाड येथे ही घोषणा करण्यात आली. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे, ठाणे, नालासोपारा तसेच अन्य शहरांत वास्तव्यास असलेल्या महाड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या गावी विनामूल्य आणि सुरक्षितपणे पोहोचता यावे, या उद्देशाने १२ आणि १३ सप्टेंबर रोजी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created) 

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाला गतवर्षी २७ बसमधून सुमारे दोन हजार ४०० गणेशभक्तांनी प्रतिसाद दिला होता. यंदा किमान १० हजार नागरिकांना या सेवेचा लाभ मिळावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

‘कॉपी केलेला उपक्रम एक वर्षात बंद’

दरम्यान, मोफत बससेवेवरून ओझर्डे यांनी कोणाचेही नाव न घेता राजकीय टोला लगावला. “गेल्यावर्षी काहींनी आमच्या उपक्रमाची कॉपी करून एका जिल्हा परिषद मतदारसंघातून गणेशोत्सवासाठी मोफत बससेवा सुरू केली. मात्र, त्यानंतर ती बंद झाली. आम्ही मात्र सामाजिक भावनेतून हा उपक्रम सातत्याने सुरू ठेवला आहे,” असे त्यांनी सांगितले.

पूर्वी करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघापुरता मर्यादित असलेला हा उपक्रम यंदा संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे. एखाद्या गावातील गणेशभक्तांची संख्या मोठी असल्यास त्या गावासाठी स्वतंत्र बस सोडण्याचाही विचार केला जाणार आहे.

मुंबईत जन्म-मृत्यू प्रमाणपत्राची प्रक्रिया होणार सोपी; अर्जासाठी स्वतंत्र प्रणाली सुरू

उपक्रम मोफत करण्याचाच मानस

संपूर्ण उपक्रम मोफत करण्याचाच मानस आहे मात्र काही कारणास्तव माफक शुल्क करण्याचा देखील विचार असून त्याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल असे देखील त्यांनी सांगितले आहे. या उपक्रमासाठी मुंबई सेंट्रल, नालासोपारा, ठाणे, पुणे आदी ठिकाणांहून गाड्या सोडण्यात येणार असून महाड, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यांतील नागरिकांना त्यांच्या गावाजवळ पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “निवडणुकीत पराभव झाला म्हणून सामाजिक उपक्रम थांबविणार नाही. लोकांसाठी काहीतरी देणे लागतो, या भावनेतून हा उपक्रम सुरू केला आहे. जीवात जीव असेपर्यंत गणेशभक्तांसाठी ही सेवा सुरू ठेवणार,” असे ओझर्डे यांनी सांगितले.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Mahad ganeshotsav free bus service announced for 10000 devotees across the constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Mahad
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
3

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश
4

‘मूक प्रेक्षकाची भूमिका घेऊ नका’;रखडलेल्या झोपु प्रकल्पांवर हायकोर्टाचे सरकारला कालबद्धतेचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.