Raigad News: कर्जतच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा? तालुका ओला-उबरसाठी खुला करण्याची भूमिपुत्र संघटनेची मागणी
14 बोगदे, 93 पूल अन्…; पुण्यात 52 हजार कोटींच्या रिंग रोडचे काम वेगाने सुरु
सध्या स्पर्धेचे युग असून या स्पर्धेच्या युगात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सेवा ग्राहकांना मिळत असून ग्राहक देखील अशा ऑनलाईन सेवेवर खुश आहे. ऑनलाईन सेवा देणाऱ्या साधनांना स्पर्धेच्या आणि डिजिटल युगात मोठे आर्थिक पाठबळ मिळताना दिसत आहे. कर्जत तालुका देशाच्या पर्यटनाच्या नकाशात पर्यटन म्हणून पुढे आला आहे. कर्जत तालुक्यात स्थानिक शेतक-यांनी फार्म हाऊस उभी करून पर्यटन व्यवसाय सुरु केले आहेत. त्या व्यवसायात स्थानिक तरुणांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. अशावेळी आता पर्यटक हा रात्री अपरात्री कधीही येत असतो आणि त्यावेळी त्या पर्यटकाला वाहने उपलब्ध होणे गरजेचे असते. (फोटो सौजन्य – AI Created)
काही प्रसंग घडल्यास हा पर्यटक रात्री देखील आपल्या घरी परत जात असतो आणि त्यावेळी त्या पर्यटकाला वाहन उपलबध होत नाही. स्थानिक वाहनचालक हे रात्रीच्या वेळी सेवा उपलब्ध करून देत नसल्याने ओला उबेरवर अवलंबून राहावे लागते. पण कर्जत तालुक्यात ओला उबेर यांना पर्यटकांना आणून सोडण्याची मुभा आहे. परत नेण्याची मुभा नाही आणि त्यामुळे ओला उबेरकडून कर्जत तालुक्यात पर्यटकांना ओन्ली ड्रॉप या प्रकारात पर्यटकांना कर्जत तालुक्यात सोडण्याचे भाडे मिळतात. पुन्हा नेण्यासाठी ओला उबेरकडून कर्जत तालुक्यासाठी भाडे मिळत नसल्याने त्यांची वाहने येत नाही. त्यामुळे कोणत्याही वेळी पर्यटकांना कर्जत तालुक्यातून निघता येत नाही.
निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश
परिणामी पर्यटक हे अडकून पडतात आणि त्यामुळे त्याचा थेट परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर होत असल्याचे फार्म हाऊस रिसॉर्ट चालक यांचे म्हणणे आहे. ही बाब लक्षात घेऊन आणि कर्जत तालुक्यातील पर्यटन वाढावे यासाठी भूमिपुत्र संघटना यांच्याकडून अध्यक्ष उदय पाटील यांनी ओला उबेर वाहनांसाठी कर्जत तालुका खुला करावा अशी मोहीम हाती घेतली आहे. कर्जत तालुक्यातील पर्यटन आपल्या तालुक्यातील प्रवासी वाहतूक करणारे कार चालक यांनी ओला उबेर सुरु करावी अशी सूचना केली आहे. आपल्या तालुक्यातील वाहनचालक यांनी आता ओला उबेर सुरु करून आपल्या तालुक्यात बाहेरचे वाहनचालक यांची वाहने येणार नाहीत यांची काळजी घेतल्यास पर्यटकांना सेवा मिळेल आणि आपल्या तालुक्यातील कार चालक यांना चांगला व्यवसाय मिळेल असे मत भूमिपुत्र संघटनेचे आहे.






