Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

माथेरानमधील शार्लोट लेकमधून काढला जाणारा गाळ नाल्यांमध्ये सोडला जात असल्याने पर्यावरणाच्या नुकसानीचा धोका निर्माण झाला आहे. गाळाचा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापर करता येत असतानाही तो पाण्याच्या प्रवाहात सोडला जात असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 21, 2026 | 02:05 PM
Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

Raigad News: माथेरानच्या शार्लोट लेकमधील गाळ नाल्यात सोडल्याचा आरोप; पर्यावरणाच्या नुकसानीची भीती, नागरिक नाराज

Follow Us
Follow Us:
  • शार्लोट लेकमधील गाळ नाल्यांमध्ये सोडल्याने तो माथेरानच्या डोंगरदऱ्यांमध्ये पसरत असल्याचा आरोप आहे.
  • सुमारे 100 मजुरांच्या मदतीने पंपाद्वारे पाणी मारून गाळ पाण्यात वाहून नेण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
  • गाळ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वापरण्याची मागणी होत असून, पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
माथेरान: गेल्या १० दिवसांपासून धरणातील गाळ बाहेर काढण्याऐवजी तो धरणामधील नाल्यांमध्ये सोडला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा गाळ नाल्यांमधून वाहत जाऊन माथेरानच्या डोंगरदऱ्यांमध्ये पसरत असल्याने स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. धरणातील गाळाचा योग्य प्रकारे पुनर्वापर करण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

Kurla Accident: कुर्ल्यात मध्यरात्री मोठी दुर्घटना! उंचावरील क्रेन अचानक घरावर कोसळली, अपघातात 8-10 जण जखमी

माथेरान शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या शार्लोट लेकमधील गाळ काढण्याचे काम मंजूर आहे. मात्र धरणातील माती मिश्रित गाळ धरणातून बाहेर काढण्यासाठी मनुष्यबळ वापरून काढण्यात येत आहे. १० ऑगस्ट रोजी धरणातील पाणी सोडून देण्यात आले, मात्र गाळ तसाच राहिल्याने १० ऑगस्टपासून धरणाचे दरवाजा असलेली विहीर बंद केलेली नाही. परंतु धरणातील गाळ वाहून गेला नसल्याने गाळ मिश्रित पाणी धरणातून वाहून जात आहे. याचा सर्वाधिक धोका नवी मुंबई पालिकेच्या मोरबे धरणाला निर्माण झाला. धरणातील माती मिश्रित गाळ काढण्यासाठी मनुष्यबळ लावले आहे.

धरणातील गाळ रस्त्यासाठी वापरला जाणार होता आणि तो गाळ पाण्यात सोडल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, या गाळाचा वापर रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी केला जाऊ शकतो. मात्र, प्रत्यक्षात ही माती पुन्हा पाण्याच्या प्रवाहात सोडली जात असल्याने उपयोग होत नाही.

गाळ पाण्यात सोडण्याचा धडाका

पालिकेने नेमलेल्या ठेकेदाराने तब्बल १०० मजूरांच्या सहाय्याने गाळ पाण्यात सोडण्याचा धडका उचलला आहे. धरणातील गाळवर पंपाद्वारे पाणी मारून ती माती पाण्यात वाहून जाईल अशा प्रकारे हे मजूर फावडा घेऊन गाळ पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रयत्नावर माथेरान नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि पर्यावरण संवेदनशील नागरिक प्रतिष्ठानच्या माध्यमातुन पालिकेच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे,

यंत्रणा कोणती भूमिका घेणार? सर्वांचे लागले लक्ष

  • माथेरानच्या जंगलतील लाल माती अनेक वर्षांपासून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाते.
  • हीच माती नियोजनबद्ध पद्धतीने काढून शहरातील रस्त्यांसाठी वापरली गेल्यास पर्यावरण टिकून राहण्यास मदत होऊ शकते.
  • धरणातील गाळ थेट नाल्यांमध्ये सोडल्याने पर्यावरणावर नेमका किती परिणाम होणार? याचा अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली.
  • संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेणार, याकडे आता माथेरानकरांचे लक्ष लागले आहे.
धरणामधील नाल्यांमध्ये सोडला जात असलेला गाळ नाल्यांमधून वाहत जाऊन माथेरानच्या डोंगरदऱ्यांमध्ये पसरत आहे, आमच्या घोड्यांना चालण्यास चांगले रस्ते नाहीत, हीच माती वापरण्यासाठी नेली असती तर आमच्या घोड्यांचे पाय मुरगळले नसते.- राकेश कोकळे, अश्वमालक

KDMC News: वाहतूक कोंडी सुटणार, शेतकऱ्यांचा मोबदला मिळणार; कल्याण-शीळ तिसऱ्या लेनचा मार्ग मोकळा

या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष वेधले असून, नगरपरिषद आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गाळ व्यवस्थापनाबाबत योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.- मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष, माथेरान

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Matheran charlotte lake silt controversy dam sludge dumped into drains environmental concerns rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Matheran
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त
1

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
2

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
3

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप
4

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.