Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

सुमारे महिनाभरापूर्वी सहाण-मोठी गाव ते बायपासदरम्यान खराब झालेला रस्त्याचा पेंच फोडून त्याठिकाणी पुन्हा काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र आता या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2026 | 01:49 PM
Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Raigad News: अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा फोडून काँक्रीटीकरण सुरू! वर्षभरातच रस्ता झाला खराब, नागरिक त्रस्त

Follow Us
Follow Us:
  • रस्ता पुन्हा फोडून नव्याने काँक्रीटीकरण सुरु
  • वाहतूक कोंडी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांची गैरसोय
  • कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित
अलिबाग: अलिबाग-रोहा मार्गावरील काँक्रीटीकरणाचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असतानाच आता केलेला रस्ता पुन्हा फोडून नव्याने काँक्रीटीकरण करण्याची वेळ आली आहे. अलिबाग-रोहा मार्गावरील बायपास ते सहाण, तसेच बायपास ते नागावदरम्यान एमएसआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामातील काही भाग खराब झाल्याने हे पॅच फोडून पुन्हा बांधले जात आहेत. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांमुळे अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागतो.

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

अलिबाग-रोहा मार्गावरील बायपास ते सहाण आणि पुढे नागावपर्यंत काँक्रीट रस्त्याचे काम गतवर्षी सुरू करण्यात आले होते. काम सुरू असताना या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. मात्र रस्ता चांगला होईल, या अपेक्षेने प्रवाशांनी या त्रासाला सहकार्य केले. मात्र अवघ्या सात-आठ महिन्यांतच रस्त्याच्या कामातील काही भाग खराब झाल्याचे निदर्शनास आले.

पॅच फोडून पुन्हा काँक्रिटीकरण

सुमारे महिनाभरापूर्वी सहाण-मोठी गाव ते बायपासदरम्यान खराब झालेला रस्त्याचा पेंच फोडून त्याठिकाणी पुन्हा काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र नव्याने केलेल्या रस्त्यालाही योग्य लेव्हल नसल्याची तक्रार असून, संबंधित ठिकाणी आजही रस्ता खराब असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. आता पुन्हा बायपास ते ढवरदरम्यान खराब झालेला रस्त्याचा पंच फोडून नव्याने कॉक्रीटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी करण्यात आलेला रस्ता पुन्हा फोडून बांधण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे है काम रात्रीच्या अंधारात करून सकाळपर्यंत पूर्ण केले जात असल्याने कामाच्या पद्धतीबाबतही प्रश्न निर्माण केले.

कोट्यवधींचा खर्च, तरी रस्ता फोडण्याची वेळ

रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात येत असताना अवघ्या काही महिन्यांतच रस्ता खराब होऊन तो पुन्हा फोडावा लागत असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नव्याने करण्यात येणारे काँक्रीटीकरण किती काळ टिकणार, असा सवालही प्रवाशांकडून केला जात आहे.

रस्त्याच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत

वारंवार सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत होत असून, वाहनचालकांना तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अलिबाग-रोहा मार्गावरील या कामाची संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या दर्जाची तपासणी करावी, तसेच निकृष्ट काम आढळल्यास जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Mumbai News: अंधेरी ईएसआयसी रुग्णालय सुरू, मात्र सुविधा अपुऱ्या! पुरुष वॉर्डाची प्रतीक्षा कायम; अन्य रुग्णालयांत जाण्याची वेळ

‘या’ आहेत प्रमुख मागण्या

  • वर्षभरापूर्वी केलेला रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ का आली?
  • रस्त्याच्या कामात कोणत्या त्रुटी राहिल्या आणि नव्याने करण्यात येणारे काम दर्जेदार पद्धतीने होत आहे का?
  • या सगळ्या बाबींची जिल्हा प्रशासनाने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Alibag roha road under scrutiny newly built concrete road damaged within months repairs begin again hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 01:49 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
1

Sanju Rathod Nakhre Song: ‘नखरे’चा मराठी फ्लेवर अन् ईशा-गुरमीतची एनर्जी; संजू राठोडचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?
2

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
3

Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
4

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.