Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

पडद्यामागून घडत असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता माथेरानमध्ये लवकरच मोठा राजकीय धमाका पाहायला मिळणार आहे. माथेरानमध्ये एका पक्षाचे काही प्रमुख नेते शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 26, 2026 | 02:59 PM
Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Raigad News: माथेरानमध्ये राजकीय भूकंपाची चाहूल! शिंदे गटात बड्या नेत्यांचा प्रवेशाची चर्चा, अधिकृत घोषणेची प्रतीक्षा

Follow Us
Follow Us:
  • माथेरानमध्ये शिंदे गटात मोठ्या संख्येने इनकमिंग होण्याची शक्यता असून, वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
  • ठाकरे गटातील काही प्रमुख नेते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, पक्षांतर झाल्यास स्थानिक राजकीय समीकरणे बदलू शकतात.
  • नेमका कोणता नेता शिंदे गटात प्रवेश करणार? याबाबत उत्सुकता वाढली असून, अधिकृत घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्जत: माथेरानमध्ये लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून तेथील शिवसेना शिंदे पक्षात मोठ्या संख्यने कार्यकर्त्यांचे इनकमिंग होण्याची शक्यता आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर राजकीय घडामोडी सुरु असून माथेरानमधील एक राजकीय पक्ष आपले अनेक वर्षाचे राजकीय अस्तित्व गमावून बसण्याची शक्यता आहे. या पडद्यामागून घडत असलेल्या राजकीय घडामोडी लक्षात घेता माथेरानमध्ये लवकरच मोठा राजकीय धमाका पाहायला मिळणार आहे.

Ratnagiri: आता थेट कोकणात लँडिंग! रत्नागिरी विमानतळावरून लवकरच सुरू होणार प्रवासी सेवा

माथेरान हे पर्यटन स्थळ असून पर्यटनाचे दृष्टीने महत्वाचे समजले जाते. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुविधा मिळवून देण्यासाठी राजकीय पक्ष आपले राजकीय आयुष्य पणाला लावत असतात. त्यामुळे सध्या विजनवासात असलेले नेते मंडळी पक्ष बदलून आपल्या शहराच्या विकासात साथ देण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मित्र पक्ष वगळता अन्य पक्ष विकासाच्या बाजुला

माथेरानमध्ये कायम गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून सत्ताधारी आपआल्याला नेतेमंडळी यांच्याकडे जाऊन निधी खेचून आणत असतात. त्यात सध्या राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेवर असल्याने भाजपचे मित्र पक्ष वगळता अन्य ही विकासाच्या बाजूला पडले आहेत. ही बाब लक्षात घेऊन माथेरानमध्ये एका पक्षाचे काही प्रमुख नेते शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

माथेरानच्या राजकारणात होणार मोठी उलथापालथ

दरम्यान, संबंधित नेत्याकडून किवा शिंदे गटाकडून याबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतरच या चर्चेला उधान येणार आहे. त्यामुळे माथेरानमध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार का? याकडे संपूर्ण कर्जत तालुक्याचे लक्ष लागले आहे. तर जाहीरपणे कोणीही बोलण्यास तयार नसल्याचे दिसून येत असून कदाचित एक पक्ष माथेरानच्या राजकारणात अस्तित्वहीन होऊ शकतो असे बोलले जात आहे.

अनेक बड्या नेत्यांचा शिंदे गटात संभाव्य प्रवेश

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत ठाकरे गटातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिंदे गटात प्रवेश झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे माथेरानमधील या संभाव्य पक्षांतराकडेही कर्जत तालुक्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. संबंधित काही नेत्यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेश झाल्यास माथेरानमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.

Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण

माथेरानच्या राजकीय वर्तुळात सध्या एका संभाव्य पक्षांतराची जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही प्रमुख नेत्याकडून लवकरच शिंदे गटात प्रवेश केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य पक्षांतरामुळे माथेरानच्या स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे. संपर्कात शिंदे गटातील वरिष्ठ नेते असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याकडून वरिष्ठ स्तरावर शिंदे पक्षात प्रवेश करून घेण्यासाठी हालचाली सुरू आहेत. भेटीगाठी आणि चर्चाबाबत राजकीय चर्चा सुरू आहे. मात्र या पक्ष प्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे नेमका कोणता नेता शिंदे गटात जाणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Matheran politics major political shake up likely leaders may join shinde faction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Marathi News
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह
1

Chandrapur News: कागदावर क्रीडांगण पूर्ण, प्रत्यक्षात काम अपूर्ण? खडसंगी ग्रामपंचायतीत 24 लाखांच्या कामावर प्रश्नचिन्ह

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र
2

Pune Municipal Corporation : विकासनिधीवरून BJP-NCP आमनेसामने, धीरज घाटेंचे सुनेत्रा पवार यांना पत्र

भावाला राखी पाठवायची राहिली? आता देश-विदेशात अवघ्या १५ मिनिटांत पोहोचवता येईल राखी
3

भावाला राखी पाठवायची राहिली? आता देश-विदेशात अवघ्या १५ मिनिटांत पोहोचवता येईल राखी

Sangli Plot Scam : सांगली महापालिकेत भूखंड घोटाळ्याचा आरोप; ‘आठ दिवसांत परत घ्या, अन्यथा आंदोलन’
4

Sangli Plot Scam : सांगली महापालिकेत भूखंड घोटाळ्याचा आरोप; ‘आठ दिवसांत परत घ्या, अन्यथा आंदोलन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.