Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: ऐन पावसाळ्यात माथेरान तहानले! तीन-तीन दिवस पाणी गायब, पर्यटन व्यवसाय संकटात

माथेरानमध्ये ऐन पावसाळ्यात माथेरानसारख्या दुर्गम पर्यटनस्थळी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 30, 2026 | 02:38 PM
Raigad News: ऐन पावसाळ्यात माथेरान तहानले! तीन-तीन दिवस पाणी गायब, पर्यटन व्यवसाय संकटात

Raigad News: ऐन पावसाळ्यात माथेरान तहानले! तीन-तीन दिवस पाणी गायब, पर्यटन व्यवसाय संकटात

Follow Us
Follow Us:
  • ऐन पावसाळ्यात माथेरानमध्ये तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
  • शार्लोट लेकमधील गाळ काढण्यासाठी तलाव रिकामा केल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे.
  • अनियमित पाणीपुरवठ्याचा थेट परिणाम माथेरानमधील हॉटेल, लॉज आणि पर्यटन व्यवसायांवर होत आहे.
माथेरान: कर्जत तालुक्यातील माथेरान या पर्यटनस्थळी ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माथेरानला पावसाळ्यात पाणीपुरवठा करणारे शार्लोट लेक धरणात पाणी नाही आणि त्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माथेरानला सध्या नेरळ येथील उल्हास नदीवरून पाणीपुरवठा होत असून शहरात अनियमित पाणी वितरीत होत असल्याने माथेरानमधील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे.

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘ॲक्शन प्लॅन’, 31 ऑगस्टची डेडलाइन; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

माथेरानमध्ये ऐन पावसाळ्यात माथेरानसारख्या दुर्गम पर्यटनस्थळी पाणीटंचाई निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही भागांत तीन-तीन दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावरही होत आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

मुबलक पाणी नसल्याने पर्यटन धोक्यात आले असून माथेरान शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शार्लोट लेकचा गाळ काढण्यासाठी तलाव पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात उपलब्ध असलेला पाणी साठाही कमी झाला आहे. नेरळ येथून पाणीपुरवठा साधारणपणे पावसाळ्यात बंद राहत असल्याने शार्लोट लेकवरच पाणीपुरवठ्याची मुख्य भिस्त असते. मात्र, तलाव रिकामा केल्यानंतर नेरळहून होणारा पाणीपुरवठा तांत्रिक अडचणींमुळे अनियमित होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील पर्यटन व्यवसायांवर होतोय विपरीत परिणाम

या पाणी टंचाईचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. शहरातील पाण्याची अनियमितता आणि तीन-तीन दिवस पुरवठा खंडित होण्यामुळे माथेरानमधील हॉटेल, लॉज आणि इतर पर्यटन व्यवसायांवर विपरीत परिणाम होत आहे. पर्यटकांना पाण्याची गैरसोय होत असल्याने व्यावसायिकांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. पर्यटन हंगामाच्या दृष्टीने पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी होत आहे.

लेकचा गाळ काढण्यात ३ दिवस पाणीपुरवठा बंद

शारलोट लेकचा गाळ काढण्याचे काम ऑगस्टमध्ये करण्याऐवजी पाण्याची पातळी कमी असलेल्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये गाळ काढण्यात आला असता तर अधिक योग्य ठरले असते, अशी भूमिका स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. तलाव रिकामा करण्याच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका ऐन पावसाळ्यात बसला आहे. तीन-तीन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याने, स्थानिकांसह व्यावसायिकांमध्ये नाराजी सर्वसामान्य नागरिकांना आणि पर्यटन व्यवसायाला बसत असल्याची नाराजीही व्यक्त केली जात आहे.

Antilia Case : परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न; सेवानिवृत्त ACP बी. आर. घाडगेंची कोर्टात याचिका, सोमवारी सुनावणी

काही व्यवसाय १००% बंद पडल्याचे चित्र स्पष्ट

सार्वजनिक व्यवस्थेला याला फटका बसत आहे. नागरिकांना मागील चार दिवस पाणी आले नाही, त्यामुळे घरची कामे देखील अर्धवट राहू, लागली आहेत. अनेक निवास आणि न्याहारी व्यवस्था चालते. अशा कुटुंबाचे व्यवसाय १००% बंद पडले. तसेच जे व्यवसाय तग धरून होते तेही या नव्या संकटामुळे धोक्यात आले आहेत. रोजगार १०० टक्के पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटकांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्यात देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Matheran water crisis during monsoon hits tourism business raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Matheran
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर
1

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल
2

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल

ठाणे मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी; ३० हजार धावपटूंचा सहभाग, शहरातील वाहतुकीत मोठे बदल
3

ठाणे मॅरेथॉनसाठी जय्यत तयारी; ३० हजार धावपटूंचा सहभाग, शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Vasai News: वसई भाजपमध्ये ‘बॅनर वॉर’; दहीहंडीच्या बॅनरवरून नगरसेवक आमनेसामने
4

Vasai News: वसई भाजपमध्ये ‘बॅनर वॉर’; दहीहंडीच्या बॅनरवरून नगरसेवक आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.